Cricketer Ravindra Jadeja joins BJP : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय जनता पक्षात प्रवेश (Bharatiya Janata Party) केला. जामनगरच्या आमदार आणि रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी X वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
राज्याचं भवितव्य तरुणांच्याच हाती; विधानसभेसाठी मतदारांची आकडेवारी जाहीर
🪷 #SadasyataAbhiyaan2024 pic.twitter.com/he0QhsimNK
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) September 2, 2024
विधानसभा निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत होता. त्यांने अनेकदा पत्नीच्यचा प्रचारार्थ अनेक रोडशो देखील केले. दरम्यान, ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजाने टीम इंडियासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता त्याने अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. पत्नी रिवाबा जडेजाने X वर याचा खुलासा केला.
भाजपने सदस्यत्व अभियान सुरू केले
सत्ताधारी पक्ष भाजपने 2 सप्टेंबरपासून पक्षाचे सदस्यत्व मोहित सुरू केली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सर्व केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. याच मोहितेअंतर्गत जडेजाने भाजपात प्रवेश केला.
आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही, त्यांचा दौरा केवळ राजकीय स्टंट…; संजय शिरसाटांचे टीकास्त्र
जडेजाची क्रिकेट कारकीर्द…
दरम्यान, जडेजाने 2024 च्या T20 विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. मात्र आता तो या महिन्यात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर जडेजाने टी-20 फॉरमॅटला अलविदा केला होता.जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने 41 डावात 515 धावा केल्या.
दरम्यान, आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जडेजा सक्रीय राजकारणात आपले नशीब आजमावणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.