Ravneet Singh : राहुल गांधींना ‘दहशतवादी’ म्हणणं भोवलं; भाजपच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल!

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना 'दहशतवादी' म्हणणं भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला चांगलच भोवलंय, कर्नाटकात रवनीत सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झालायं.

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Ravneet Singh : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिलीयं.

राहु गांधी बॉम्ब बनवणाऱ्यांना पाठिंबा देत असेल तर राहुल गांधी एक नंबरचे दहशतवादी आहेत. एवढंच नाही तर जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिलायं.

दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा, विजय शिवतारेंशी खास कनेक्शन

सोशल मीडियावर बिट्टू यांचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये बिट्टू म्हणाले, राहुल गांधी जेव्हा शिखांच्या विरोधात बोलले तेव्हा त्यांना सर्वात मोठ्या शत्रूने पाठिंबा दिला होता. खलिस्तानी समर्थक गुरपत सिंद पन्नून याच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी विधान केलं असल्याचं बिट्टू म्हणाले आहेत. गुरपतवंत सिंग यांनी गांधींच्या विधानांना पाठिंबा दिल्याने भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका-टिप्पणी केली जात आहे.

मी आव्हान देतो, जे शिख लोक इथे आहेत त्यांनी सांगावं की शिख समुदाय कुठल्या पक्षाशी जोडला गेला आहे का? भागलपूरमध्ये त्यांना (राहुल गांधी) कुणीतरी सांगितलं आम्ही पगडी घालू शकत नाही, कडं वापरु शकत नाही. कुणी सांगितलं हे? कोण म्हणतंय गुरुद्वारामध्ये आम्हाला जाता येत नाही? मला एका शिख बांधवाने सांगावं मी भाजपा सोडून देईन. भांडणं लावण्यासाठी आधी मुस्लीम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आता शिख समुदायांत भांडणं लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंत्री बिट्टू यांनी केलायं.

Exit mobile version