Download App

RBI चा पेटिएमला दणका; 29 फेब्रुवारीनंतर वॉलेटमध्ये पैसे जमा करून घेण्यावर बंदी

  • Written By: Last Updated:

RBI-Paytm Payments Bank 2024: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) पेटीएम बँकेला (Paytm Bank) मोठा धक्का दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. RBI ने 31 जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, वॉलेटमध्ये आणि फास्टॅगवर ठेवी/टॉप-अप स्वीकारण्यास मनाई केली आहे.

Video : अनिल कपूरची पद्यामागाची गंमत, पाहा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या मेकिंगची झलक!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टम ऑडिट अहवाल आणि त्यानंतरच्या काही अहवालांमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. याशिवाय पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर बाबीही समोर आल्या आहेत. त्यामुळं पेटीएमवर कडक कारवाई करण्यात आली आहे. पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. या बंदीनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत. तसेच वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी कार्ड देखील टॉपअप केले जाणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल 

ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार
सध्या नवीन ग्राहक जोडू नयेत, अशा सूचना आरबीआयने दिल्या. तसेच, ग्राहकाला त्याच्या खात्यातून पैसे काढण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहक त्यांच्या बचत, चालू, प्रीपेड, फास्टटॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतील.

कोणत्याही प्रकारची ठेव स्वीकारली जाणार नाही

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्याही ग्राहकाकडून पैसे जमा करू नयेत. 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात कोणत्याही प्रकारची ठेव स्वीकारली जाणार नाही. हे पैसे वॉलेट, फास्टॅग किंवा इतर कोणत्याही प्रीपेड प्रणालीद्वारे घेतले असले जमा करू नयेत. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सिस्टम ऑडिट अहवाल अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अहवालांवरून असे दिसून आले की बँक अनेक आर्थिक नियमांचे पालन करण्यात सातत्याने अपयशी ठरली आहे. याशिवाय अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात प्रीपेड सेवा, वॉलेट, फास्टॅग, NCMC कार्ड इत्यादींमध्ये रक्कम जमा करणे, टॉप अप करणे, क्रेडीट व्यवहार करता येणार नाही. मात्र, व्याज जमा करणे, कॅशबॅक किंवा अन्य परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पेटीएम बँकेवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आरबीआयने यापूर्वी पेटीएम बँकेवर कारवाई केली होती. तीन महिन्यांपूर्वी केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने पेटीएमवर मोठा दंड ठोठावला होता. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याआधी 2021 मध्येही आरबीआयने पेटीएम बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी पेटीएमवर काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

follow us