RBI Bank Note : चलणात लवकरच नवीन 10 आणि 500 रुपयांच्या नोटा येणार असल्याची माहिती देशाची सर्वात मोठी बॅंक आरबीआयने (RBI) दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, चलनात लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 10 आणि 500 मूल्याच्या नोटा जारी करण्यात येणार आहे. या नोटांवर विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची स्वाक्षरी असणार आहे.
याबाबत माहिती देताना आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, या नवीन नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील आधीच जारी केलेल्या 10 आणि 500 च्या नोटांसारखी असेल. त्यामुळे त्यांच्या डिझाइनमध्ये किंवा सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नोटांमध्ये बदल म्हणून फक्त विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. तर दुसरीकडे आरबीआयने स्पष्ट केले आहे की यापूर्वी जारी केलेल्या सर्व 10 आणि 500 च्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील. याचा अर्थ असा की जुन्या नोटा चलनात राहतील त्यामुळे सामान्य जनतेला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
श्री संजय मल्होत्रा, गवर्नर के हस्ताक्षर वाले महात्मा गांधी (नई) शृंखला में ₹10 और ₹500 मूल्यवर्ग के बैंक नोट का निर्गम
Issue of ₹10 and ₹500 Denomination Banknotes in Mahatma Gandhi (New) Series bearing the signature of Shri Sanjay Malhotra, Governorhttps://t.co/DSU88cwTQV— ReserveBankOfIndia (@RBI) April 4, 2025
मोठी बातमी! वक्फ विधेयकाविरुद्ध ओवैसी सर्वोच्च न्यायालयात; संसदेत फाडली होती विधेयकाची प्रत
100 आणि 200 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या
गेल्या महिन्यातही आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती, ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वाक्षरी केली होती. संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे.