GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा…

RBI On Gold Rate 76 हजारांवरून थेट 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत गेलेल्या सोन्याने सगळ्यांचेच गणित बिघडवले होते. पण आता...

GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा...

GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा...

RBI On Gold Rate : गेल्या दोन वर्षांत सोन्याने जो काय धुमाकूळ घातलाय, तो पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले आहेत. 76 हजारांवरून थेट 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत गेलेल्या सोन्याने सगळ्यांचेच गणित बिघडवले होते. पण आता ज्या रिझर्व्ह बँकेकडे (RBI) देशाच्या पैशांचा हिशोब असतो, त्याच बँकेने सोन्याच्या गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दराबाबत एक ‘धोक्याची घंटा’ वाजवली आहे. सोन्याच्या बाबतीत RBI ने एक असा अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे सोन्याचा दर 2 लाखांच्या पार जाणार की, हा केवळ एक ‘फुगा’ आहे? जाणून घेऊया नेमकं RBI ने काय म्हटलंय?

सोन्याची विक्रमी घोडदौड (2024 – 2026) 

सगळ्यात पहिले तर, वर्ष 2024 ते 2026 या दोन वर्षातील सोन्याची घोडदौड कशी होती त्यावर नजर टाकली तर, डिसेंबर 2024 मध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 76,000 रुपये होता. त्याच्या बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये हाच दर दुपटीच्या जवळ जवळ म्हणजे १,४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. तर, जानेवारी 2026 मध्ये आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित काढत सोन्याचा भाव 1,80,000 रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले.

फुगा फुटणार?

एकीकडे सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या सोन्याबद्दल RBI ने त्यांच्या ‘मौद्रिक धोरण’ अहवालात सोन्यावर खास दोन पानं खर्ची घातली आहेत. यात आरबीआयच्या मते, सोन्याचा हा दर सध्या ‘बबल’ म्हणजेच एका फुग्यासारखा झाल्याचं म्हटलं आहे. म्हणजचे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा एखादी गोष्ट तिच्या खऱ्या किंमतीपेक्षा खूप जास्त महाग होते, तेव्हा त्याला ‘बबल’ म्हणतात. हा फुगा जेव्हा फुटतो, तेव्हा किंमती धडाधड खाली कोसळतात. हा अहवाल तयार करण्यासाठी आरबीआयने 1960 पासूनचा डेटा तपासला आणि त्यात असं आढळलं की, डिसेंबर 2023 नंतर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही 95% धोक्याच्या पातळीवर आहे. म्हणजे आता इथून पुढे भाव वाढण्यापेक्षा ते कोसळण्याची शक्यता जास्त आहे.

सर्वसामान्यांनी काय करावं?

आरबीआयच्या या भल्या मोठ्या अहवालानंतर अनेकांच्या पोटात गोळा उठलाय तर, सोन्याच्या किमती आवाक्यात येणार म्हणून आस लावून बसलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलंय. मात्र, तज्ञांच्या मते, सोन्याचा हा दर सध्या ‘न्याय्य’ नाही. म्हणजे सोन्याचा भाव आज जो आहे, तो खूप जास्त फुगवून सांगितलेला आहे. त्यामुळे आता सोन्यात मोठी गुंतवणूक करण्याची ही वेळ नसून, जर तुम्ही कमी भावात सोनं घेतलं असेल, तर सध्याचा भाव पाहून थोडा नफा पदरात पाडून घेणं शहाणपणाचं ठरेल.

पुढे काय होणार?

आरबीआयने सोन्याचा हा फुगा नेमका कधी फुटेल याची तारीख जरी सांगितली नसली, तरी इशारा स्पष्ट दिला आहे की, गेल्या दोन वर्षांत दिसलेली तुफान तेजी आता थंडावण्याची शक्यता आहे. सोन्यात थोडीफार उसळी येईलही, पण मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने आता गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे सोनं घेताना आता 10 वेळा विचार करा, कारण आरबीआयचा इशारा तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतो.

Exit mobile version