Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी रेल्वेंचा भीषण (Odisha Train Accident) अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचे प्राण गेले. तर अनेक जण जखमी झाले. अपघात कशामुळे घडला, चूक कोणाची आहे, यामागे काही घातपात तर नाही ना, केंद्र सरकार आणि रेल्वेचे हे अपयश आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Vaishnaw) यांनी या अपघाताबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. (Railway Minister Ashwini Vaishnaw exposed the reason of this horrific Odisha Train Accident)
अपघात नेमका कशामुळे घडला याचा खुलासा मंत्री वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. वैष्णव म्हणाले, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या घटनेचा तपास केला. अपघात कशामुळे घडला याचे कारण समजले आहे. या अपघातासाठी कोण जबाबदार आहेत याचीही माहिती मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलावामुळे ही दुर्घटना घडली.
भीषण अपघातात 280 मृत्यू, दोन फोन अन्…; घटनास्थळावर PM मोदी अॅक्शन मोडमध्ये
कवच प्रणाली नसणे हे अपघाताचे कारण नाही. हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याने घडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अपघात कोणत्या दुसऱ्या गोष्टीमुळे झाला आहे असे म्हटलेले नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
या घटनेसाठी जबाबदार कोण आहेत हे आता समजले आहे. तपासाचा अहवालही लवकरच मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल सूचना दिल्या होत्या. एका ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. आता इलेक्ट्रिसिटी नीट करण्याचे काम सुरू आहे. आज रेल्वे ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे वैष्णव म्हणाले.
आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू
ओडिशातील बालासोरमधील बहनागा बाजारात शुक्रवारी ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1175 जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यातील 793 प्रवाशांना डिस्चार्ज दिला आहे. तर 385 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. यामधील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेने मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना दहा लाख, गंभीर जखमींना दोन लाख तर अन्य जखमींना 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.