REIT Investment : भारतातील सामान्य माणूस आजही जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करणं सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहे. (Investment ) पण तुम्ही देशातील एका मोठ्या व्यावसायिक केंद्रात किंवा ऑफिसमध्ये फक्त 140 रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला दर 3 महिन्यांनी भाडे मिळेल. REIT च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. सोप्या भाषेत, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच REIT हे गुंतवणूकीचे असे साधन आहे जे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
अमेरिकेतून भारतात परतताच राहुल गांधींनी केलं आश्वासन पूर्ण; हरियाणातील तरुणाच्या घरी दिली भेट
समजा तुम्हाला देशातील सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला करोडो रुपये खर्च करावे लागणार नाहीत. तुम्ही कमी पैशात REIT द्वारे अप्रत्यक्षपणे BKC मध्ये गुंतवणूक करू शकता. जर REIT ने BKC मध्ये मालमत्ता खरेदी केली, तर एक सामान्य गुंतवणूकदार त्या मालमत्तेत युनिट होल्डर बनू शकतो. सध्या तुम्ही REIT चे 1 युनिट/शेअर 140 रुपये ते 385 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
REIT ही जवळजवळ म्युच्युअल फंड कंपनी (AMC) सारखा आहे. म्युच्युअल फंडामध्ये, फंड मॅनेजर तुमचे पैसे चांगल्या कंपन्यांमध्ये/शेअर्समध्ये गुंतवून तुम्हाला परतावा देतो, तर REIT मध्ये, अनुभवी व्यावसायिक तुमचे पैसे भारतातील चांगल्या व्यावसायिक केंद्रांमध्ये किंवा ऑफिस स्पेसेस किंवा मॉलमध्ये गुंतवतात. कंपन्यांना जागा भाड्याने दिली जाते. त्यातून जे काही भाडे मिळते, ते खर्च वजा करून ते सर्व पैसे गुंतवणूकदारांना दिले जातात.
SEBI च्या नियमांनुसार, REITsला त्यांच्या कमाईतील 90 टक्के गुंतवणूकदारांना भरावे लागतात. नियमांनुसार, गुंतवणूकदारांना 6 महिन्यातून एकदा तरी भाडे/लाभांश/वितरण/भाडे देणे आवश्यक आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे सध्या भारतातील चारही REIT कंपन्या प्रत्येक गुंतवणूकदारांना भाडे/लाभांश/वितरण/भाडे देतात.
REIT गुंतवणूकदार दर तीन महिन्यांनी केवळ भाडेच मिळवत नाहीत, तर रिअल इस्टेटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भांडवली वाढीचा लाभही त्यांना मिळतो. भांडवलाची वाढ दोन प्रकारे होते: मालमत्तेच्या किमतीत वाढ आणि शेअरच्या किमतीत वाढ. समजा तुम्ही कोणत्याही REIT मध्ये 100 रुपयांना शेअर खरेदी केला आणि उद्या शेअरची किंमत रु. 130 झाली, तर भाड्याच्या उत्पन्नाव्यतिरिक्त तुम्हाला 30 रुपये अतिरिक्त मिळतील.
श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक; दीड कोटी मतदार अन् 39 उमेदवार, कुणाचं पारडं जड..
REIT मॉडेल बऱ्याच काळापासून जगात अस्तित्वात आहे. मार्च 2019 मध्ये जेव्हा देशातील पहिले REIT, Embassy Office Parks REIT लाँच करण्यात आले तेव्हा भारत REIT मॉडेलमध्ये सामील झाला. नवीन REIT हे Nexus Select Trust आहे, जे 2023 मध्ये स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले होते.