Foreign investment : विदेशी गुंतवणूक खेचण्यात महाराष्ट्र ठरला अव्वल!
Foreign investment : यंदाच्या अर्थिक वर्षात 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्राने आता पहिल्या तिमाहीतही इतर राज्यांना मागे टाकलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण 36, 634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक खेचून महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. डीपीआयआयटीने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पसंती दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती ट्विट करुन दिली आहे.
आनंदाची बातमी !
2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.
डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या… pic.twitter.com/fCOtzJ627k— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 28, 2023
डीपीआयआयटीच्या माहितीनूसार एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली असून दिल्लीत 15,358 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून कर्नाटकात 12,046 कोटींची विदेशी गुंतवणूक करण्यात आलीयं. तर चौथ्या क्रमांकावर तेलंगणा राज्य आहे, या राज्याला 6,829 कोटींची विदेशी गुंतवणूक खेचण्यात यश आलं आहे.
NCP Crisis : पवारांकडून बोध घ्या; गुलाबरावांनी राऊतांना डिवचलं
देशातील इतरही राज्यांत विदेशी गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक केली असून त्यामध्ये गुजरात राज्यात 5,993 कोटी, तामिळनाडूत 5,181 कोटी, हरयाणामध्ये 4, 056 कोटी, झारखंडमध्ये 79 कोटी, राजस्थानात 785 कोटी आणि पश्चिम बंगाल 438 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती डीपीआयआयने माहिती दिली आहे.
दरम्यान, दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु असल्यानेच गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती दिली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.