Download App

मोठी बातमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा; अनेक चर्चांना उधाण

Shaktisinh Gohil Resigns: आज देशातील चार राज्यातील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचे निकाल जाहीर करण्यात आले असून पाचपैकी

  • Written By: Last Updated:

Shaktisinh Gohil Resigns: आज देशातील चार राज्यातील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचे निकाल जाहीर करण्यात आले असून पाचपैकी आम आदमी पार्टीने 2 तर भाजप (BJP) , काँग्रेस (Congress) आणि टीएमसीला (TMC) एक- एक जागा मिळाली आहे. गुजरातमध्ये एक जागेवर भाजपने तर एका जागेवर आम आदमी पक्षाला विजय मिळाला असून काँग्रेसला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला आहे.

तर आता एक मोठी बातमी समोर आली असून गुजरातमधील काडी आणि विसावदर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल (Shaktisinh Gohil) यांनी अचानक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले शक्तीसिंह गोहिल?

निवडणूक निकाल आल्यानंतर, शक्तीसिंह गोहिल म्हणाले, भारतातील सर्वात जुन्या आणि निःसंशयपणे सर्वोत्तम राजकीय पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक असल्याचा मला अभिमान आहे. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि नेहमीच माझ्या पक्षाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आज आम्हाला यश मिळाले नाही. आम्ही विसावदर आणि काडी पोटनिवडणुकीत हरलो आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमचे दूरदर्शी नेते राहुल गांधी, संघटन सरचिटणीस वेणुगोपाल आणि गुजरात प्रभारी मुकुस वासनिक यांच्याकडून मिळालेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

राजीवजी आणि सोनियाजी यांचे मार्गदर्शन हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आशीर्वाद आहे ज्याने मला एक व्यक्ती आणि एक सार्वजनिक सेवक म्हणून घडवले आहे आणि मी नेहमीच त्यांचा आभारी राहीन. आपल्या पक्षाच्या खऱ्या भावनेने आणि त्याच्या गौरवशाली परंपरेनुसार, मी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे आणि काही तासांपूर्वी गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मी माझ्या सर्व पक्ष नेत्यांचे, पक्षाच्या सर्वोत्तम कार्यकर्त्यांचे, माझे हितचिंतकांचे, माध्यमांचे आणि इतर सर्वांचे माझ्यावर असलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल आभार मानतो. असं त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

follow us