Download App

Video : भरधाव रिक्षाने आईला उडवल; मुलीची धाडसी झेप, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुक

मंगळुरू येथील एका मुलीने मोठ्या अपघाताला न घाबरता आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आई एका मोठ्या अपघातातून बचावली.

  • Written By: Last Updated:

Mangaluru accident video : मंगळुरू येथील एका मुलीने मोठ्या अपघाताला न घाबरता आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिची आई एका मोठ्या अपघातातून बचावली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (accident ) त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (video) ज्यावर नेटिझन्स त्या मुलीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

Video: बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल तर आम्ही काय?..राऊतांचा अमित शहांवर वार

ऑटो वर उचलली

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळूर येथील एक महिला आपल्या मुलीला शिकवणीतून घेऊन जात असताना रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात एक ऑटो भरधाव वेगात आली. त्यामुळे महिला गोंधळली. तेवढ्यातच ती ऑटो रिक्षा महिलेला धडकली आणि रिक्षा तिच्या अंगावर पडली. शेजारील मुलीने धावत जाऊन आईच्या अंगावर पडलेली ऑटो उचलण्याचा प्रयत्न केला. ऑटोमधील लोकांनीही खाली उतरून ऑटो वर उचलली.

CNG : गणेशोत्सवातच नागरिकांच्या खिशाला झळ; पुणे, पिंपरीमध्ये CNG महागला, काय आहेत नवे दर?

पुरस्कार द्या

या घटनेत मुलीची आई किरकोळ जखमी होऊन बचावली आहे. स्थानिकांनी तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ काही हजार लोकांनी पाहिला आहे. मुलीचे कौतुक केले. त्या मुलीला नक्कीच पुरस्कार द्यायला हवा. तिने न घाबरता जे करायचं होतं ते केलं”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

वाहनांचा चिंतेचा विषय

स्थानिक अधिकारी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा शोध घेत आहेत. तपासाचा एक भाग म्हणून ओव्हरस्पीडिंग आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात आहे. बेदारकपणे वाहन चालवतात. अनेक ठिकाणी लोक कसलाही विचार न करता लोकांना चिरडून जात आहेत. अनेक ठिकाणी मद्यपी गाडी चालवतात त्यामध्ये अनेकांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. अशा गाड्या चालवण्याचा चिंतेचा विषय बनला आहे.

 

 

follow us

संबंधित बातम्या