Download App

लालूंच्या जामिनावरुन आरजेडी-भाजपमध्ये लाडू युद्ध; आमदाराचे कपडेच फाडले

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Laluprasad yadav), त्यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची मुलगी आणि आरजेडी खासदार मीसा भारती (Misa Bharti)यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणात जामीन (Bail)मिळाला आहे. (Land For Job Scam) राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) लालू यादव, मिसा भारती आणि राबडी देवी यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याचा आरजेडी नेत्यांनी लाडू वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी आरजेडीचे नेते भाजप आमदारांना चिडवण्यासाठी त्यांच्यामध्ये गेले अन् लाडू वाटत होते.

भाजपचे लोक ते लाडू घेणं आणि खाणं टाळत होते आणि आरजेडीचे आमदार बळजबरीने त्यांना लाडून भरवत होते. दरम्यान, भाजपच्या एका आमदाराने गडबडीत उठून लाडू फेकला आणि तो बाकीच्या आमदारांच्या डोक्याला लागला. तेवढ्या झटापटीत पाटणाच्या कुम्हरार येथील भाजपचे आमदार अरुणकुमार सिन्हांचे कपडेच फाटले. त्यामुळं काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

अजित पवार म्हणाले, कसब्यातला विजय राज्यकर्त्यांना झोंबला…

त्यावर भाजपचे आमदार म्हणाले की, विषारी लाडू आम्हाला जबरदस्तीने खाऊ घातले जात होते, पण जेव्हा आम्ही ते लाडू खाल्ले नाही, तेव्हा त्यांनी आमच्या अंगावर टाकून दिले आणि झटापट केल्याचाही आरोप भाजप आमदारांनी यावेळी केला.

तर दुसरीकडं आरजेडीच्या आमदारांकडून आपण आनंदात लाडू वाटत असल्याचं सांगत आहेत. त्यांना कोणी काहीही जबरदस्ती केली नाही. तर आरजेडीच्या आमदारांनी जाणीवपूर्वक लाडूचे बॉक्स फेकल्याचा आरोप भाजप आमदारांकडून केला जात आहे.

त्या झटापटीमध्ये भाजप आमदार अरुण सिन्हा यांचे कपडे फाडल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. इकडं विधानसभा अध्यक्षांनी लाडू वादावर महाआघाडीच्या आमदारांना इशारा देत हे सर्व चुकीचं असून अशा प्रकारे वागू नये, असंही म्हटलं आहे.

Tags

follow us