अजित पवार म्हणाले, कसब्यातला विजय राज्यकर्त्यांना झोंबला…

अजित पवार म्हणाले, कसब्यातला विजय राज्यकर्त्यांना झोंबला…

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre)येथे बैठक घेतली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं? हे पाच विधानपरिषद निवडणुकांच्या जागांच्या निकालावरुन दिसून आलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदार संघात (Teacher-Graduate Constituency), पदवीधरांच्या मनात काय आहे? हे आपल्याला पाहायला मिळालं. शिक्षकांच्या मनात काय आहे? तेही आपल्याला पाहायला मिळालं, चिंचवड (Chinchwad)आणि कसब्याची (Kasba)निवडणूक झाली. 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकरसारखा (Ravindra Dhangekar)कार्यकर्ता निवडूण येतो, ते राज्यकर्त्यांना झोंबलेलं आहे, त्याच्यामुळं ते पण खडबडून जागे झाले आहेत, असंही यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना, सभेला उशीर झाल्यानं सुरुवातीलाच अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त केली. पवार यावेळी म्हणाले की, तुम्हाला माहित आहे की, अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पावर आम्ही केलेल्या चर्चेवर सरकारकडून उत्तरं दिली जात असल्यामुळं आम्हाला सभागृहामधून बाहेर जाता येत नसल्याचं यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!

महाविकास आघाडीची बैठक बोलावण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या सर्वांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर काही लोकांचं मतमतांतर होतं. वैचारिक भूमिका वेगळी होती. कधी कोणी सांगितलं असतं की, अशी कधी आघाडी होईल तर काहिंनी विश्वासही ठेवला नसता, परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाकरीता, महाराष्ट्राच्या भल्याकरिता अडचणीचे काही मुद्दे समोर न आणता, बाकीच्या सर्व मुद्द्यांवर एकत्र येण्याचं ठरलं.

त्यानंतर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. पूर्ण बहुमत होतं, सरकार अडीच वर्ष चांगलं चाललं. कॉंग्रेस, राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना आग्रह केला की, तुमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी टाकली आहे. तर तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी घ्यावी, शेवटी सर्वांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरेंनी जबाबदारी घेतली. त्याच्यात आम्ही सर्वजण सहभागी झालो अन् कारभार सुरु केला.
थोडंसं कुठं अडचण येऊ नये म्हणून आम्ही समन्वय व्यवस्थित साधण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये उद्धव ठाकरे म्हणायचे की, आपण राज्य पातळीवर एकत्र आलो आहोत. परंतु आपल्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या स्तरावरावर किंवा गाव, महापालिकेच्या वॉर्ड आहेत तीथंपण आपल्या सर्वांमध्ये मनोमिलन झालं पाहिजे.

अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात काम केल्यामुळं त्यांच्या मनातली तशा प्रकारची भावना कमी करावी लागणार आहे, तसे विभागवार मेळावे घ्यावे लागणार आहेत. पण पुढे आपलं सरकार आलं. त्यानंतर कोरोना आला अन् लॉकलाऊन लागला. या गोष्टी जवळजवळ दीड दोन वर्ष चालल्या.

एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस आपल्या राज्यात आलेला आहे. काही शहरांमध्ये तशा प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं काळजी घेतली पाहिजे. नीती आयोगाचं म्हणणं आहे की, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करायलाच हवा, असं त्यांनी आवाहन केलं आहे. कारण हे जर वाढलं तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो? हे अर्थमंत्री म्हणून मी अनुभवलं आहे.

ज्येष्ठ मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अशोक चव्हाण, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी अनुभवला आहे. तुम्ही सर्वांनीच आपापल्या पद्धतीनं अनुभवला आहे. तर ते पण एक संकट आहे. त्याच्यावर पण आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. आपल्याला जे मागं दोन अडीच वर्ष करता आलं नाही ते करायला हवं होतं अशीही खंत पवारांनी यावेळी बोलून दाखवली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube