Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!

Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!

मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे आगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकत्र, एकदिलाने लढले पाहिजे. अन्यथा आपणच आपल्यात तंगड्यात तंगडे घालून पडू, याची काळजी घ्या, असा इशारा; उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे नेतृत्व मान्य नाही का? शरद पवारांचा जयजयकार उद्धव ठाकरेंना पचनी पडलं नाही का, भाषणा दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पवारांसाठी पंतप्रधान पद ही दूरची गोष्ट आहे’. याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

Jobs : एका वर्षात ३ लाख ७३ हजार नागरिकांनी सोडला भारत!

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भारत माता कुठे आहे. त्यामुळे भारत माता की जय कशाला बोलता. सगळीकडे मोदी म्हणजेच देश समजला जात आहे. सध्या दडपशाहीने काम सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुकांचे पत्ता नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पत्ता नाही. त्या घेण्याची हिंमत नाही. पण एक नक्की सांगतो २०२४ ची लोकसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे लोकशाही टिकवायचे असेल तर केवळ नेत्यांनीच नाही तर सगळ्यांनीच सावध होणे गरजेचे आहे. भाजपमध्ये आज निवडणुका घेण्याची हिम्मत नाही. ती हिम्मत दाखवा म्हणावं… मग बघा जनता कशी प्रकारे धडा शिकवते नाही. हे तुम्हाला कळेल.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे नेतृत्व मान्य नाही का? शरद पवारांचा जयजयकार उद्धव ठाकरे यांना पचनी पडलं नाही का, भाषणा दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार पंतप्रधान व्हावे. ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. पण पवारांसाठी पंतप्रधान पद ही दूरची गोष्ट आहे. मात्र, त्यासाठी आगदी गावपातळीवरून आपल्याला तयारी करावी लागेल. त्यासाठी कामाला लागा. अन्यथा आपणच आपल्या तंगड्यात तंगड्या घालून पडू, यासाठी काळजी घेण्याचे आनाहन केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube