Jobs : एका वर्षात ३ लाख ७३ हजार नागरिकांनी सोडला भारत!
नवी दिल्ली : नोकरी (Jobs) आणि पैशासाठी (Money) भारतातून मागील एका वर्षात तब्ब्ल ३ लाख ७३ हजार ४३४ लोकांनी परदेशात स्थलांतर (Foreign Migration) केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंजाब (Panjab) राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतची आकडेवारी लोकसभेत केंद्र सरकारने (Central Government) सादर केल्याने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने १४ मार्च रोजी नोकरी आणि पैशासाठी भारतातून किती लोकांनी परदेशात स्थलांतर केले. याबाबतची आकडेवारी लोकसभेत सादर केली. सन २०२२ या वर्षात भारतातून ३ लाख ७३ हजार ४३४ लोकांनी परदेशात स्थलांतर केले आहे. यामध्ये एकट्या पंजाब राज्यातील १० हजार ६५४ लोकांचा समावेश आहे.
भारत सरकारने सन १९८३ साली स्थलांतर कायद्या अंतर्गत लोकांना नोकरी व इतर कारणासाठी परदेशात स्थलांतर करण्यास परवानगी दिली आहे. जगभरातील १८ देशात जाण्यास या कायद्या अंतर्गत मुभा देण्यात आली आहे. यामध्ये कतार, ओमान, कुवेत, जॉर्डन, येमेन, सुदान, दक्षिण सुदान, बहारीन, इंडोनेशिया कतार, मलेशिया, लिबिया, संयुक्त अरब अमीरात, सौऊदी अरब, अफगाणिस्तान, लेबनान, सिरिया, थायलंड आणि इंडोनेशिया आदी देशांचा समावेश करण्यात आला आहे.
Banking Crisis Explainer : ४८ तासांत सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर बँक का बुडाली ?
संयुक्त राष्ट्र संघाने सादर केलेल्या अहवालानुसार सन २०२० सालापर्यंत नोकरी आणि इतर कारणामुळे विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय लोकांची संख्या तब्ब्ल १ कोटी ८० लाख इतकी आहे. जगभरात स्थायिक झालेल्या ३ कोटी २० लाख लोक भारताशी संबंधित आहेत. त्यातील १ कोटी ८० लोकं हे तर थेट भारतीयच आहे. ही लोकसंख्या जगभरातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने सादर केलेल्या अहवालात प्रामुख्याने भारतीय लोकं अमेरिका, सौउदी अरब आणि संयुक्त अरब अमीरात या तीन देशात सर्वाधिक स्थलांतरीत झाले आहेत. तर त्यानंतर ब्रिटन, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशातही भारतीय लोकं मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. या सर्व लोकांचे भारत सोडण्याचे मुख्य कारण नोकरी, उच्च राहणीमान असेच आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत भारतातील लोकं जगभरातील १०० देशांमध्ये ३ कोटी २० लाख लोकं स्थायिक झाले आहेत. सन १९९० साली परदेशात स्थायिक भारतीय लोकांची संख्या केवळ ९० लाख इतकी होती. तर गेल्या २८ वर्षात त्यामध्ये ३४६ टक्के वाढ झाली आहे.