Download App

“अन्यथा, लिपस्टिक आणि ‘बॉब कट’वाल्या संसदेत प्रवेश करतील…” : लालूंचा आणखी एक खासदार वादात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागासलेल्या समाजातील महिलांना आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा आरक्षणाच्या नावाखाली “लिपस्टिक आणि बॉब-कट हेअरस्टाइल घातलेल्या” महिला संसदेत प्रवेश करतील, असं म्हणत राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना, ते बोलत होते. यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) खासदार मनोज झा (Manoj Jha) यांनी राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सादर केलेल्या ‘ठाकूर’ कवितेने सुरु झालेला वाद अद्याप शमला नसताना, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या पक्षातील आता आणखी एका नेत्याने या विषयावर वादग्रस्त भाष्य केले आहे. (Rashtriya Janata Dal’s senior leader Abdul Bari Siddiqui’s controversial statement on the Women’s Reservation Act)

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेने आणि राज्यसभेने एकमताने मंजूर केले. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विधेयकावर स्वाक्षरी करत याचे कायद्यात रुपांतर केले. यानंतर विविध स्तरांवर महिला आरक्षणावर भाष्य केले जात आहे. याचवेळी बोलताना अब्दुल बारी सिद्दीकी म्हणाले, म्हणाले, केंद्र सरकारने मागासलेल्या समाजातील महिलांना आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा आरक्षणाच्या नावाखाली “लिपस्टिक आणि बॉब-कट हेअरस्टाइल घातलेल्या” महिलाच फक्त पुढे येतील, संसदेत प्रवेश करतील.

काँग्रेसने दारुत भ्रष्टाचार केला, गायीचे शेणही सोडले नाही… : PM मोदींचा हल्लाबोल

यावर भाजप खासदार सुनीता दुग्गल यांनी जोरदार टीका केली. “यावरून त्यांची संकुचित मानसिकता दिसून येते. महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अशी विधाने करणे ही त्यांची असभ्य मानसिकता दर्शवते. महिलांनी केवळ घरचे काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. काम करा आणि बाहेरच्या जगात योगदान देऊ नका, असे त्यांचे मत आहे, असे दुग्गल म्हणाल्या. तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माझी यांनी, राजकारण्यांनी महिलांना दुखावणारी विधाने टाळली पाहिजेत, असे आवाहन केले. मागासवर्गीय महिलांनी पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही महिला आरक्षण विधेयकात एससी, एसटी आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणाबाबतही बोलत आहोत, असेही त्या पुढे म्हणाल्या.

MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !

दरम्यान, वाद होताच आणि टिकेला सामोरे जावे लागताच सिद्दीकी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, त्यांचे विधान म्हणजे केवळ महिला आरक्षण कायद्याचे परिणाम ग्रामीण महिलांना “त्यांच्या भाषेत” समजावून सांगण्याचा प्रयत्न होता. त्या रॅलीत शेकडो ग्रामीण महिला होत्या. मी ती भाषा ग्रामीण महिलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी वापरली होती. माझा हेतू कोणाला दुखावण्याचा नव्हता. कोणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. हा अत्यंत मागासवर्गीयांचा मेळावा होता आणि मी त्यांना शिकवत होतो. राष्ट्रीय जनता दल सुरुवातीपासूनच महिला आरक्षणाला पाठिंबा देत आहे, असेही त्यांनी म्हंटले.

Tags

follow us

वेब स्टोरीज