Rohini Acharya On Raj Thackeray : मुंबईत छठ पूजा आयोजनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोध केल्याने बिहारमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पावसाळ्यात बेडूक बाहेर येतात, त्याचप्रमाणे छठ येताच काही लोक समोर येतात, असा टोला त्यांनी लगावला.
‘चित्रपताका–२०२६’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ! सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईत छठ पूजा आयोजनाला राज ठाकरे यांच्या पक्षाने आक्षेप घेतला होता. मनसेच्या नेत्यांनी बाणगंगा येथे छठपूजा करण्यास विरोध दर्शवत मुंबई पोलिसांना पत्र दिले आहे. याशिवाय गिरगाव चौपाटीसह अन्य ठिकाणी छठ पूजेनंतर होणारी अस्वच्छता आणि पर्यावरणाचे नुकसान यांचा हवाला देत पूजा रोखण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपली भूमिका मांडली. छठ पूजेशी संबंधित सोशल मीडिया रील्सना त्यांनी ‘सांस्कृतिक आक्रमण’ असे संबोधले. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी संगीत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तो मनसेने रोखल्याचा दावाही त्यांनी केला.
‘मोठा गडी दमला, आता लहान्या गड्याचा नंबर’; मनोज जरांगेंचा फडणवीसांसह महायुतीवर निशाणा
‘छठ येताच माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी बाहेर पडतात’
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहिणी आचार्य यांनी म्हटले की, हे राज ठाकरे कोण आहेत आणि त्यांना कोणते नेते समर्थन देत आहेत ? त्यांना ओळखतो तरी कोण? दरवर्षी छठ येताच काही लोक माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी समोर येतात. अशा लोकांकडून बिहारची संस्कृती आणि आस्थेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे रोहिणी आचार्य म्हणाल्या.
‘छठी मैया राज ठाकरे यांना सद्बुद्धी देवो’
रोहिणी आचार्य यांनी पुढे टोला लगावत म्हटले की, छठी मैया राज ठाकरे यांना सद्बुद्धी देवो. त्यांच्या मनात भरलेला द्वेष आणि घाण दूर करो. एक दिवस राज ठाकरे आणि त्यांच्यासारखे अन्य लोकही छठ पर्व मोठ्या उत्साहाने साजरे करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
