Video : दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप

काल मुंबईत पत्रकार परिध घेऊन अनेक तर्काच्या आधारे बाबी मांडल्यानंतर आज रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन असेच काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

Ajit Pawar

दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप

अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मुख्य वैमानिक सुमित कपूर (Ajit Pawar) यांची भूमिका संशयास्पद असल्याच मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. या विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या, ‘ओह शीट… ओह शीट बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार याचा अंदाज आल्यामुळंच त्या तसं बोलल्या असाव्यात, असा तर्क रोहित पवार यांनी मांडला आहे. काल मुंबईत पत्रकार परिध घेऊन अनेक तर्काच्या आधारे बाबी मांडल्यानंतर आज रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन असेच काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होतं. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळं त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळलं. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

Video : अजितदादांचा अपघात नाही, घातपात! रोहित पवारांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ

अजित पवार यांचे विमान जे पायलट चालवणार होते, ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सुमित कपूर यांना आयत्यावेळी वैमानिक म्हणून पाठवण्यात आलं. पण मुंबईत सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिक कुठं असतं? कॅप्टन मदन यांच्या पत्नीने ट्विट केलं आहे की, माझ्या पतीला काहीही झालं नाही, तुम्ही आम्हाला सांत्वनाचे मेसेज पाठवू नका. लोकांना वाटलं होतं, कॅप्टन मदन अजित पवार यांचं विमान चालवत आहेत. सुमित कपूर यांच्याविषयी कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळे खरोखरच कॅप्टन मदन आणि त्यांचा क्रू ट्रॅफिकमध्ये अडकला होता का? यासाठी सीसीटीव्ही तपासले हवेत अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे.

सध्या जोकाही या घटनेची चौकशी सुरू आहे तो वेग अत्यंत हळू आहे. कॅप्टन सुमीत कपूर यांना 2010 आणि 2017 साली दारु पिऊन विमान चालवल्याप्रकरणी परवाना रद्द करण्यात आला होता. ते विमान अपघाताच्या आदल्या दिवशी हाँगकाँगवरुन आल्याचं सांगितले जातं. काही महिन्यांपूर्वी भाजपचा एक नेता विमानाने नांदेडला जात होता. त्यावेळी कपूर वैमानिक होते. तिकडेही ज्याप्रकारे लँडिग झालं होतं, त्याची तक्रार संबंधित नेत्याने केली होती. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, तसंच, कंपनीचा मालक विजय सिंग हा पोहोचलेला व्यक्ती आहे. तो कागदपत्रात छेडछाड करू शकतो. पुरावे नष्ट करू शकतो. चौकशीत हस्तक्षेप करू शकतो. यापूर्वीही त्याने प्रकरणं दाबली आहेत असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Exit mobile version