Download App

Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rules Change From 1st May 2023 : एप्रिल महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही ना काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत, हे नियम जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया या बदलांविषयी…

सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा, पराभवानंतर रवी राणांची प्रतिक्रिया

GST नियमांमध्ये बदल
मे महिन्याच्या सुरुवातीपासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना 7 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) व्यवहाराची पावती अपलोड करणे बंधनकारक होणार आहे. सध्या इनव्हॉइस तयार करण्याच्या आणि अपलोड करण्याच्या तारखेसाठी अशी कोणतीही मर्यादा नाही.

म्युच्युअल फंडात KYC अनिवार्य
म्युच्युअल फंड कंपन्यांना बाजार नियामक सेबीने हे निश्चित करण्यास सांगितले आहे की, गुंतवणुकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. याची अंमलबजावणी 1 मेपासून होणार आहे. यानंतर गुंतवणुकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात.

LPG, CNG आणि PNG च्या किंमती
केंद्र सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी, सीएनसी-पीएनजीच्या नवीन किंमती जाहीर करते. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2,028 रुपयांवर आला. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.

PNB ATM व्यवहार
आपण जर पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank)ग्राहक असाल तर हा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे नसल्यास आणि तुम्ही एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास बँक ग्राहकाकडून एटीएम व्यवहार शुल्क आकारेल. हे शुल्क 10 रुपये + जीएसटी लागणार आहे.

प्रमोशनल अन् स्पॅम कॉल्सपासून सुटका
कॉल्स आणि एसएमएसमध्ये एआय फिल्टर्स सुरु केल्यामुळे वापरकर्त्यांना टेलिमार्केटिंगच्या नावाखाली येणारे संदेश आणि कॉलपासून सुटका होणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलने देखील आपल्या सिस्टीममध्ये वापरकर्त्यांसाठी एआय फिल्टर स्थापित करण्यास सुरुवात केली आहे. जिओ लवकरच युजर्ससाठी हे फिल्टर सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us