Sam Pitroda resigned from the Indian Overseas Congress : दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे लोकांसारखे दिसतात, असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा (Sam Pitroda ) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या (Indian Overseas Congress ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.
सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरजीज कॉंग्रेसचा राजीनामा; जयराम रमेश यांची माहिती
जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
श्री सैम पित्रोदा ने अपनी मर्ज़ी से इंडियन ओवरसीज कांग्रेस के अध्यक्ष पद से इस्तीफ़ा देने का फ़ैसला किया है। कांग्रेस अध्यक्ष ने उनका इस्तीफ़ा स्वीकार कर लिया है।
Mr. Sam Pitroda has decided to step down as Chairman of the Indian Overseas Congress of his own accord. The Congress…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 8, 2024
केंद्रात जिंकलो तर गरम-गरम तव्यावर विधानसभेची पोळी भाजावी लागेल -दानवे
सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते भारतातील अनेक भागात राहणाऱ्या नागरिकांच्या रंगावरून वांशिक टिप्पणी केली आहे. त्यांनी पूर्वेकडील भारतीयांची तुलना चिनी लोकांशी आणि दक्षिण भारतीयांची तुलना आफ्रिकन लोकांशी केली. यावरून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने हे पित्रोदा यांचं वैयक्तिक मत असून याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं. भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांनी केलेली तुलना दुर्दैवी आणि स्वीकारार्ह नाही. भारतीय काँग्रेस याला समर्थन देत नाही, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदींची टीका
पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आणि कॉंग्रेसवर सडकून टीका केली जातेयच. तेलंगणातील वारंगलमध्ये सभा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सॅम पित्रोदा यांचा समाचार घेतला. त्यांच्या तत्त्वज्ञानाने कातडीच्या आधारे देशवासीयांचा अपमान केला. शिवीगाळ केली. आज मला खूप राग आला आहे. लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण असं विधान मला सहन होणार नाही. माझ्या देशातील लोकांच्या त्वचेच्या रंगावरून त्यांची गुणवत्ता ठरवली जाईल का? त्यांना कातडीच्या रंगाचा खेळ खेळण्याचा अधिकार कोणी दिला? संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक माझ्या देशाचा अपमान करत असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.