Download App

गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला जोडप्याचा रामराम; समोसा विकून करतायेत लाखोंची कमाई

  • Written By: Last Updated:

भारतात अनेक पदार्थ आहेत ज्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अशाच एका पदार्थानं एका जोडप्याचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मल्टी नॅशनल कंपनीत असलेली नोकरी सोडून हे दाम्पत्य सध्या लोकांना समोसा खाऊ घालण्याचं काम करतयं. विशेष म्हणजे या व्यवसायातून या जोडप्याला पाच पन्नास नव्हे तर, दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा शोध सुरू

बंगळुरूस्थित निधी सिंग आणि त्यांचे पती शिखर वीर सिंग असे समोसा विकून लाखोंची कमाई करणाऱ्या जोडप्याचं नाव आहे. निधी आणि शिखर या दोघांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. दोघेही बंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनीत काम करत होते. एकेदिवशी या जोडप्याने ऐशोआरामातील नोकरीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि समोसा विक्री सुरू केली.

अशी झाली ‘समोसा सिंग’ची सुरुवात
प्रकाशित वृत्तामनुसार, निधी आणि शिखर दोघांची पहिली भेट हरियाणामध्ये झाली होती. दोघेही त्यावेळी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक करत होते. यानंतर शिखरने हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसमधून एमटेकचे शिक्षणही घेतले. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. मात्र, त्यानंतर 2015 मध्ये दोघांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये नोकरी सोडल्यानंतर या जोडप्याने 2016 पासून समोसा सिंह नावाचे पहिले समोसा आउटलेट सुरू केले.

निधी आणि शिखरने त्यांच्या स्पप्नातील व्यवसाय प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःचं घरही विकले आणि त्यातून मिळालेली रक्कम व्यवसायात गुंतवली. आज निधी आणि शिखर यांचा समोसा सिंग हा अतिशय लोकप्रिय समोसा ब्रँड बनला आहे. बटर चिकन समोसा आणि कढई पनीर समोसा हे समोसे सर्वाधिक विकले जातात असे या जोडप्याने सांगितले.

Tags

follow us