Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा शोध सुरू

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (11)

Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश (Cheetah Helicopter Crash) झाले आहे.  या घटनेत दोन पायलट बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. नेमका हा अपघात कसा झाला याची कोणतेही ठोस कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.

अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ एका ऑपरेशनल सॉर्टी उड्डाण करणाऱ्या आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टरचा आज सकाळी 09:15 च्या सुमारास ATC शी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. बोमडिला पश्चिमेकडील मंडाळाजवळ हा अपघात झाला असून, पायलटचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्या आले आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत, पीआरओ संरक्षण गुवाहाटी यांनी दिली आहे. 

बोमडिलाजवळ नियमित उड्डाणावेळी ही धक्कादायक दुर्घटना घडली. सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर बोमडिलाच्या पश्चिमेला मंडलाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली.  या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. तसेच यातील पायलट बेपत्ता असून त्यांचा शोधदेखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. या घटनेत जिवीतहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Tags

follow us