Download App

‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

Narendra Modi : सनातन धर्माच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरली आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं आहे.

TYFC Trailer Out : भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सनातन धर्माविरोधात विधान केली जात आहे. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका न करता सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्यासाठी नेत्यांनी अभ्यासपूर्ण विधाने करून विरोधकांना तथ्यांसह चोख प्रत्युत्तर द्या, असंही मोदी म्हणाले आहेत.

कोरोना गेला आता झिकाची धास्ती! मुंबईत झिकाबाधित दुसरा रुग्ण आढळला…

तसेच सनातन धर्मावर अनेक नेते बोलत आहेत, त्यांना काही नेत्यांकडून समर्थनही दिलं जात आहे, त्यामुळे इतिहासात जाऊ नका आणि घटनेच्या कक्षेत राहून केवळ तथ्यांवर बोलू नका, संविधानाच्या चौकटीतच बोलण्याचा सल्ला यावेळी मोदी यांनी दिला आहे, नेत्यांनी बोलताना इतर धर्मांवर टीका करु नये, हे सांगण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरलेले नाहीत.

Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली…

भारत विरुद्ध ‘इंडिया’ :
भारत विरुद्ध इंडियाच्या मुद्द्यावरही भाजपच्या नेत्यांनी सावधपणे आपली भूमिका स्पष्ट करण्याचा सल्लाही पंतप्रधान मोदींनी दिला आहे. या प्रकरणी अधिकृत प्रवक्त्यांनीच आपले म्हणणं मांडावं, असंही ते म्हणाले आहेत. प्रत्येकाने विचार करुनच या मुद्द्यावर बोलावं अन्यथा बोलूच नये, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर टीका केली जाण्याची शक्यता आहे, त्यामध्ये सनातन धर्म, भारत विरुद्ध इंडिया, या मुद्द्यांचा समावेश असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेत्यांना काही सूचना केल्या आहेत.

Tags

follow us