Download App

मोदी-चंद्रचूड भेटीनंतर राऊतांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, शंका पक्क्या झाल्या…

घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी

  • Written By: Last Updated:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत काल (दि.11) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachood) यांच्या निवासस्थानी हजेरी लावत आरती केली. मोदींच्या या भेटीनंतर आता विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या असे म्हणत हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी वेगळं काही घडतंय का?असा प्रश्नही उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On PM Modi & CJI DY Chandrachood Arati Video)

वर्षा बंगल्यावर CM शिंंदे अन् अजितदादांची खलबतं; जागावाटपासह ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

वेगळ काही घडतंय का?

घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले आहेत. असे असताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्या घरी पोहोचल्याने सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? असा प्रश्न करत लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या, असंही संजय राऊत म्हणाले.

नंबरचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या ‘आयड्रॉप’चा विक्री परवाना निलंबित; कारण काय?

मोदी-चंद्रचूड संविधान आणि प्रोटोकॉलला धरून आहे का?

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का?, याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही?, तारखांवर तारखा का पडत आहेत? याबाबत आमच्या मनात आता शंका आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल; वीस किलोमीटरपर्यंत चालवा फ्री गाडी, ‘या’ अटी लागू

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

एकीकडे मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेल्याने विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरू केली आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरूनही या भेटीवर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, अनेकांनी या घटनेवर नापसंती व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे महाराष्ट्रातून येतात त्यामुळे काहींनी या भेटीचा संबंध थेट महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांशी लावला आहे.

follow us