केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील वृद्धांना मिळणार मोफत उपचार

  • Written By: Published:
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील वृद्धांना मिळणार मोफत उपचार

Ayushman Bharat Yojana: केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेत 70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJY) 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आज (11 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हरेज मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे 4.5 कोटी कुटुंबांना आणि 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली आहे. तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतील.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा कव्हरेजसाठी स्वतंत्र कार्ड मिळणार आहे. तर या योजनेत जे आधीच समाविष्ट आहे त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप-अप मिळेल अशी देखील माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आधीच जर इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेत असतील तर ते त्यांची सेवा सुरु ठेवू शकतात किंवा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची निवड करू शकता. तसेच 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक आधारावर प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळेल.

70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे आधीच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यासारख्या इतर सरकारी आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहे ते एकतर विद्यमान योजना सुरु ठेवू शकतात किंवा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची निवड करू शकता.

MG Windsor EV भारतात लॉन्च, मिळणार 331KM रेंज अन् किंमत आहे फक्त 9.9 लाख रुपये

याच बरोबर खाजगी आरोग्य विमा पॉलिसी किंवा कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत असलेले 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेसाठी पात्र असतील अशी माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube