MG Windsor EV भारतात लॉन्च, मिळणार 331KM रेंज अन् किंमत आहे फक्त 9.9 लाख रुपये

  • Written By: Published:
MG Windsor EV भारतात लॉन्च, मिळणार 331KM रेंज अन् किंमत आहे फक्त 9.9 लाख रुपये

MG Windsor EV : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांकडून इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी वाढत असल्याने भारतीय बाजारात एकापेक्षा एका मस्त मस्त इलेक्ट्रिक कार्स लाँच होत आहे. यातच जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आज भारतीय बाजारात MG Motors आपली नवीन इलेक्ट्रिक कार MG Windsor EV लाँच केली आहे. या कारमध्ये ग्राहकांना दमदार फीचर्ससह पावरफुल बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात येत आहे.

MG Windsor EV बॅटरी

MG Windsor EV मध्ये कंपनीकडून 38 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे या कारला 100 टक्के चार्ज होण्यासाठी 13.8 तास लागतात आणि फास्ट चार्जरद्वारे अवघ्या 55 मिनिटांत 0-80 टक्के ही कार चार्ज होते. कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये परमेन्ट सिंकोरियस मोटर दिले आहे जी 136 पीएसची पावर आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. त्यामुळे ही कार तब्बल 331 किलोमीटरपर्यंत रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच MG Windsor EV ची लांबी 4295 मिमी, रुंदी 2126 मिमी, उंची 1677 मिमी, व्हीलबेस 2700 मिमी आहे. याच बरोबर या कारची ग्राउंड क्लीयरन्स 186 मिमी आहे आणि बूट स्पेस 604 लीटर आहे.

MG Windsor EV फीचर्स

कंपनीकडून या कारमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहे. ग्राहकांना या कारमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED DRLs, 17 आणि 18-इंच टायर, फ्लश डोअर हँडल, ग्लास अँटेना, क्रोम फिनिश विंडो बेल्टलाइन, गोल्डन टच हायलाइट्ससह नाईट ब्लॅक इंटीरियर्स, लेदर पॅकसह डॅशबोर्ड, ड्रायव्हर आर्मरेस्ट, डोअर ट्रिम, स्टीयरिंग सारखी फीचर्स पाहायला मिळणार आहे.

यात ॲम्बियंट लाइट्स, रियर एसी व्हेंट्स, पीएम 2.5 फिल्टर, 10.1-इंच टच डिस्प्ले, 7- आणि 8.8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्स, 15.6-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जर पोर्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, 6-स्पीकर आणि 9 -स्पीकर इन्फिनिटी ऑडिओ सिस्टम पॅनोरॅमिक सनरूफचा पर्याय, एरो लाउंज सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, 6 वी पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, स्मार्ट एंट्री सिस्टम, स्मार्ट स्टार्ट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर यासारखी फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.

MG Windsor EV सेफ्टी फीचर्स

MG Windsor EV मध्ये ग्राहकांच्या सेफ्टीसाठी सहा एअरबॅग्ज, हिल असिस्ट, ESS, 360 डिग्री कॅमेरा, LED कॉर्नरिंग लाइट्स, रिअर फॉग लॅम्प, डिस्क ब्रेक ऑटो होल्ड, ISOFIX चाइल्ड अँकरेज, रेन सेन्सिंग वायपर, ऑटो हेडलॅम्प, फॉलो मी हेडलॅम्प्स सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

फरार नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, करोडो रुपयांची मालमत्ता जप्त

MG Windsor EV किंमत

भारतीय बाजारात ही इलेक्ट्रिक कार एक्साइट, एक्सक्लुझिव्ह आणि एसेन्स व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कार खरेदीसाठी तुम्हाला 3 ऑक्टोबरपासून बुकिंग करता येणार आहे तसेच या कारची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून सुरू होईल. भारतीय बाजारात ही कार Tata Nexon EV, Mahindra XUV 400 ला स्पर्धा देणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या