Download App

आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर, बड्या नेत्याचा भाजपवर खळबळजनक आरोप

Sanjay Singh Allegation On Bjp Offered 15 Crore To AAP MLA : एका बड्या नेत्याने भाजपवर (BJP) खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर केलाय. दिल्लीत नुकतंच विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) पार पडल्या आहेत. यानंतर संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केल्याचं समोर आलंय.

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या, अन्यथा संसदेबाहेर आंदोलन करणार; निलेश लंके आक्रमक

संजय सिंह यांनी आरोप केलाय की, आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी फोन आलेत. भाजपमध्ये या, 15 कोटी रुपये देऊ करण्यात असं देखील समोरील व्यक्तीने म्हटलंय. निकालापूर्वीच भाजपने पराभव स्वीकारला आहे. आम्ही आमदारांनाहे ऑडिओ कॉल रेकॉर्ड करण्यास आणि त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितलंय. आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आहे, केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा देखील संजय सिंह यांनी केलीय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलेल्या आठ ‘आप’ आमदारांनी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी १ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आमदारांनी पक्षातून राजीनामा देण्याचे कारण कथित भ्रष्टाचार आणि ‘आप’च्या विचारसरणीपासून विचलन असल्याचं सांगितलं होतं. संजय सिंह म्हणाले की, निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना या ऑफर मिळाल्या आहेत. ते त्यांना 15 कोटी रुपये देण्याबद्दल आणि आम आदमी पक्ष सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास ऑफर देत आहेत.

VIDEO : श्रेयवादाची लढाई रंगली, मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार अन् महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा

निवडणूक निकालापूर्वीच भाजपने पराभव स्वीकारला असल्याचं संजय सिंह म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात आम्ही सर्व आमदार आणि उमेदवारांना सांगितलंय की, असे जे कॉल येतील, त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करावे. त्याचा व्हिडिओ बनवावा आणि याची माहिती माध्यमांना द्यावी.

आम्ही आमच्या सर्व आमदारांना सतर्क केलंय. मतमोजणीपूर्वी भाजपने पराभव स्वीकारलाय. घोडेबाजार त्यांनी दिल्लीतही सुरू केलाय. याआधीही भाजपकडून आमदारांना घोडेबाजार करण्याचे प्रयत्न झाले होते. भाजप पैसे आणि तपास यंत्रणांचा वापर करते, ते दबाव निर्माण करण्यासाठी कोणतेही मार्ग वापरतात, असं देखील खासदार संजय सिंह यांनी स्पष्ट केलंय.

follow us