SC Ex Judge Markandey Katju Sad After Pakistan Loss Match Agents India : भारतीय संघाकडून पाकिस्तानचा झालेल्या परभवानंतर मला अतिव दुःख झाले आहे असे विधान सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. टी20 विश्वचषकात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा काल (दि.15) 61 धावांनी दणदणीत पराभव केला. यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण असताना काटजू यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याबाबत काटजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठी पोस्ट लिहित मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काटजू यांची पोस्ट नेमकी काय?
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये काटजू लिहितात की, भारत आणि पाकिस्तान हे एकच राष्ट्र मानतो. जे ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिमांना आपापसात लढत ठेवण्यासाठी ‘बोगस’ द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे विभागले गेले. ब्रिटिशांचे हे कारस्थान केवळ यासाठी होते की, एकसंध भारत चीनप्रमाणे एक आधुनिक औद्योगिक महासत्ता म्हणून उदयोन्मुख होऊ नये आणि पाश्चात्य उद्योगांना आव्हान देऊ नये.
Though an Indian, I regard India&Pakistan as 1 country, only temporarily divided by a British swindle, to keep Hindus&Muslims fighting each other, on basis of bogus2nation theory, so that united India does not emerge as a modern industrial giant, like China, for which we have…
— Markandey Katju (@mkatju) February 16, 2026
मी भारतीय असलो तरी पाकिस्तानच्या टीमलाही मी माझीच टीम मानतो. त्यामुळे काल कोलंबोमध्ये पाकिस्तानचा झालेला पराभव पाहून मला दुःख झाले आहे, जसे अनेक पाकिस्तानी नागरिकांना झाले असेल. जेव्हा एक देश दुसऱ्याशी लढतो तेव्हा ठीक आहे, पण इथे आपण स्वतःशीच लढत आहोत असे मला वाटते.
Ind Vs Pak : 10 सेकंद, 70 लाख आणि कोट्यवधी प्रेक्षक, भारत-पाकचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट
पाक संघाला केली सूचना
एकीकडे पाकिस्तान संघा पराभूत झाल्यानंतर काटजू यांनी दुःख झाल्याचे म्हटले आहे तर, दुसरीकडे या पराभवावर केवळ दुःख व्यक्त करून प्रश्न सुटणार नसून,काटजू यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी एक क्रांतिकारी सूचना मांडली आहे. ज्यात त्यांनी पाकिस्तान सरकारने विद्यमान क्रिकेट बोर्ड बरखास्त करून अध्यक्ष म्हणून जावेद मियाँदाद, उपाध्यक्ष वसीम अक्रम तर, सदस्य म्हणून वकार युनूस, इंजमाम-उल-हक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि एक तज्ज्ञ फिरकीपटू या दिग्गजांचे नवीन बोर्ड स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नवीन बोर्डाला खेळाडू निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य, पुरेसा निधी आणि आधुनिक सुविधा दिल्या जाव्यात. जर या सूचना अमलात आणल्या, तर पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा 1992 प्रमाणे जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोहोचेल आणि विश्वचषक जिंकू शकेल, असा विश्वास काटजू यांनी व्यक्त केला आहे.
