Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, 2025 च्या श्री अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra 2025) तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाविकांसाठी अमरनाथ यात्रा 3 जुलै रोजी सुरू होणार असून ही यात्रा 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 39 दिवसांच्या या प्रवासासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था देखील केली आहे.
अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात, मुख्य सचिव अटल धुल्लू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत अमरनाथ यात्रेला अंतिम मान्यता देण्यात आली.
श्री अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भाविकांना 3 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत बाबा बर्फानी यांचे दर्शन घेता येईल. अमरनाथ यात्रा 39 दिवस चालणार आहे.
अमरनाथ यात्रा दरवर्षी 45 ते 60 दिवस चालत असते. गेल्या वर्षी भाविकांनी 29 जून ते 19 ऑगस्ट या कालावधीत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. मात्र यंदा अमरनाथ यात्रा फक्त 39 दिवस चालणार आहे.
क्लासिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘नमस्ते लंडन’ पुन्हा प्रक्षेकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार रिलीज
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अमरनाथ यात्रेसाठी ट्रस्ट आणि सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी सुरक्षितता, निवास आणि लंगरसाठी विशेष सुविधा असणार असल्याची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.