क्लासिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘नमस्ते लंडन’ पुन्हा प्रक्षेकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Namastey London Re-release : अक्षय कुमार आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) ऑन-स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चर्चेत राहिली आहे आणि त्यांच्या क्लासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘नमस्ते लंडन’ (Namastey London) . हा चित्रपट प्रदर्शित होऊन 18 वर्षे झाली आहेत आणि या चित्रपटाला क्लासिक रोमँटिक कॉमेडीचा दर्जा मिळाला आहे. नमस्ते लंडन आज स्ट्रॉंग स्टोरी, अभिनय आणि जबरदस्त सॉंग्ससाठी ओळखला जातो. तर आता पुन्हा एकदा नमस्ते लंडन प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अक्षय कुमारने (Akshay Kumar) सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
‘नमस्ते लंडन’ या होळीला 14 मार्च रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या जोडीच्या चाहत्यांसाठी ही एक खास भेट आहे. याबाबत माहिती देताना अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 14 मार्च रोजी होळीला #NamasteyLondon पुन्हा मोठ्या पडद्यावर येत आहे. याबाबात माहिती देताना खूप आनंद होत आहे! पुन्हा एकदा जादूचा अनुभव घ्या – अद्भुत गाणी, आयकॉनिक संवाद आणि @katrinakaif सोबत पुन्हा एकदा चित्रपटगृहात भेटूया!”
View this post on Instagram
विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची स्टोरी, दिग्दर्शन, साउंडट्रॅक आणि अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट खूप हिट ठरला होता. बॉक्स ऑफिस 2007 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला होता. याशिवाय चित्रपटाचा दृश्य अनुभवही उत्तम होता. पंजाब, लंडन आणि यूकेमधील 50 वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे चित्रीकरण झाले होते.
… तर आम्ही युद्धासाठी तयार, ‘त्या’ प्रकरणात अमेरिकेवर संतापला चीन, दिलं आव्हान
आता ‘नमस्ते लंडन’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये परतत असल्याने, प्रेक्षकांसाठी हा होळीचा दुहेरी उत्सव बनेल. अक्षय कुमारचे क्लासिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी सोशल मीडियावर अनेकदा झाली आहे. अशा परिस्थितीत, 14 मार्च रोजी ‘नमस्ते लंडन’चे पुनरागमन चाहत्यांसाठी एक खास भेट ठरेल.