… तर आम्ही युद्धासाठी तयार, ‘त्या’ प्रकरणात अमेरिकेवर संतापला चीन, दिलं आव्हान

USA Tariff Policy : संपूर्ण जगात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नवीन टॅरिफ धोरणावर (New Tariff Policy) चर्चा होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून भारतासह (India), चीन (China) आणि दक्षिण कोरियावर (South Korea) नवीन टॅरिफ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणावर चीनने प्रत्युत्तर देत जर अमेरिका व्यापार निर्बंधांच्या स्वरुपात युद्ध करणार असेल तर आम्ही यासाठी पूर्णपणे तयार आहोत असं चीनने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर ड्रॅगन शेवटपर्यंत ही लढाई लढेल. असं प्रत्युत्तर चीनने दिले आहे.
चीनच्या अमेरिकन दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, जर अमेरिकेला युद्ध हवे असेल, मग ते टॅरिफ युद्ध असो, व्यापार युद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो, आम्ही ते शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून भारत, चीन आणि इतर देशांवर कर लादण्याची घोषणा केल्यानंतर चीन देखील आता आक्रमक भूमिकेत आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प ?
इतर देशांनी गेल्या अनेक दशकांपासून आपल्यावर कर लावले आहेत. आता त्या देशांविरुद्ध त्यांचा वापर सुरू करण्याची आपली पाळी आहे. युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको, कॅनडा – तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकले आहे का? असंख्य इतर देशांनी आपल्यावर आपल्यापेक्षा खूप जास्त कर लावले आहेत. हे खूप अन्याय्य आहे, असं ट्रम्प म्हणाले होते. याचबरोबर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की आता अमेरिकेने अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लादणाऱ्या देशांविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार अन् बदनामीचा खटला दाखल करणार, आरोपांवर मंत्री गोरे स्पष्टच बोलले
तर आता चीनने ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनने म्हटले आहे की ते कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संघर्षापासून मागे हटणार नाहीत आणि शेवटपर्यंत लढतील. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेत अनेक मुद्द्यांवर मतभेद सुरु आहे.