Download App

Seema Haider : सीमा अन् सचिनने दिली ‘गुड न्यूज’, पाचव्यांदा झाली आई

Seema Haider : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी सीमा हैदर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सीमा हैदर पाचव्यांदा आई झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Seema Haider : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सीमा हैदर पाचव्यांदा आई झाली आहे. मंगळवारी पहाटे 4.30 वाजता ग्रेटर नोएडा येथील एका रुग्णालयात सीमाने मुलीला जन्म दिला आहे. 2023 मध्ये सीमा तिच्या चार मुलांसह पाकिस्तानहून दुबई आणि नेपाळमार्गे भारतात आली होती. मात्र आतापर्यंत तिला भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. सचिन आणि सीमाची PUBG गेम खेळत असताना भेट झाली होती.

डिसेंबर 2024 मध्ये एक व्हिडिओ शेअर करून सीमा आणि सचिनने सीमा गर्भवती असल्याची माहिती दिली होती. सीमा हैदर 13 मे 2023 रोजी तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. तर 4 जुलै 2023 रोजी सीमाला भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक देखील करण्यात आली होती मात्र 7 जुलै रोजी स्थानिक न्यायालयातून सीमाला जामीन मिळाला होता. त्यानंतर सीमा आणि सचिनने गौतम बुद्ध नगरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते. तेव्हापासून दोघेही राबुपुरामध्ये पती-पत्नी म्हणून राहत आहेत.

पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर…, नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा इशारा

follow us