Seema Haider : पब्जीवरुन ओळख झाली अन् आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आता सीमाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी थेटपणे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. त्यांना विचारण्यात आले की, सीमाला हद्दपार करता येईल का? त्यावर कुमार यांनी सांगितले की, याबाबत कायदा अस्तित्वात आहे, त्याचे पालही केले जाईल. त्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाईदेखील सुरु झाली आहे.(Seema Haider sachin meena love story the end sent back to pakistan indian government)
Ashes 2023: ख्रिस वोक्सच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कांगारू पहिल्या डावात 317 धावांत गारद
प्रशांत कुमार म्हणाले की, सीमा हैदरची सध्या चौकशी सुरु आहे. सर्व एजन्सी आपापले काम करत आहेत. ही बाब देशांशी संबंधित आहे. पुरावे मिळेपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही. कायदेशीर आदेशानुसार कारवाई केली जात आहे. सीमा हैदरविरोधात पुरेसे पुरावे असल्याशिवाय तीला पाकिस्तानी गुप्तहेर म्हणणेही योग्य ठरणार नाही, असेही कुमार यांनी सांगितले.
लोक रस्त्यावर… वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता? अजितदादा अन् फडणवीसांना पटोलेंनी सुनावले
सीमा आणि तिचा प्रियकर सचिन मीना याची यूपी एटीएसने दोन दिवस चौकशी केली. त्याला ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती. मात्र 7 जुलै रोजी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सीमाने सांगितले की, ती नेपाळमार्गे भारतात आली. सचिनसोबत राहण्यासाठी ती बसने नोएडात आली. दोघे पब्जी खेळताना ऑनलाईन भेटले आणि नंतर प्रेमात पडले, अशी माहिती सांगितली.
लखनऊ येथील डीजीपी मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमेवरील हद्दपारीचा निर्णय केंद्रीय यंत्रणांना घ्यायचा आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी असलेल्या सीमा या आयएसआयची एजंट असण्याची शक्यता वर्तवली आहे. जेव्हा हद्दपारीची चर्चा सुरु झाली त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, एखाद्याला हद्दपार केव्हा केले जाते? त्याबद्दलचा कायदा नेमका काय आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ब्रृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा, लैंगिक छळप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर
आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटवण्याचा आणि निर्वासित करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने इमिग्रेशन विभागामार्फत घेतला आहे. त्यासाठी एक प्रक्रिया असून हे काम फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजेच एफआरआरओकडून केले जाते. अवैध स्थलांतरितांना प्रथम अटक केली जाते. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्याऐवजी त्यांना हद्दपार केले जाते.
अटक केल्यानंतर लगेच त्यांना एफआरआरओमध्ये हजर केले जाते, तेथून त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्याचे आदेश दिले जातात. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी 15 ते 60 दिवस लागतात. अशी कार्यालये आणि डिटेन्शन सेंटर वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु करण्यात आले आहेत.
सीमा हैदर आणि तीचा प्रियकर सचिनची यूपी एटीएकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता गृह विभागाकडून सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सीमाजवळ दोन व्हिडीओ कॅसेट, चार मोबाईल, पाच पाकिस्तानी पासपोर्ट आणि एक आधार कार्ड आणि नाव नसलेला पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सुरु आहे.