सेन्सेक्स, निफ्टीत तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण; ‘हे’ आहेत सहा प्रमुख कारणे ?

Sensex crashes- सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी-50 (Nifty) हे दोन्ही निर्देशांक (index) जवळ-जवळ दोन टक्क्यांनी घसरले.

Indian Share Market Crash

Indian Share Market Crash

Sensex and Nifty down 2% : इराण-इस्रायल (Israel-Iran War) युद्धामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा सपाटा लावल्याने भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी-50 (Nifty) हे दोन्ही निर्देशांक (index) शुक्रवारी जवळ-जवळ दोन टक्क्यांनी घसरले. (Sensex crashes nearly 1,500 pts, Nifty down 2%: Six key factors behind market decline for third day)

युद्धाच्या छायेतही गॅस पुरवठा सुरळीत; गॅस सिलिंडर पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय

शेअर बाजार घसरणीसह उघडला. दुपारी दीड वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 1487 अंकांनी घसरला. एका दिवसात 1.96 टक्के घसरण झाली. सेन्सेक्स 74 हजार 546 अंकांवर कामकाज करत आहे. निफ्टीमध्ये 492 अंकांची घसरण झाली आहे. एका दिवसात 2 टक्के सर्वात मोठी घसरण झाली आहे. तर निफ्टी 23,146 अंकांवर कामकाज करत होती.3029 शेअर्स घसरले आहेत. तर 743 शेअर्स वाढले आहेत. केवळ 131 शेअर्समध्ये काहीच बदल झालेला नाही. आतापर्यंत या आठवड्यात सेनेक्समध्ये 4.5 टक्के घसरण झाली आहेत. तर निफ्टीमध्ये 4.8 टक्के घसरण झालीय. डिसेंबर 2024 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.


बदला घेणार आता थांबणार नाही…, खामेनी इज बॅक… ट्रम्प यांची धाकधूक वाढवणारा व्हिडिओ व्हायरल


सेन्सेक्समध्ये हे शेअर्स घसरले

सेन्सेक्स लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, इंटरग्लोब एव्हिएशन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि टेक महिंद्रा हे प्रमुख कंपन्यांचे शेअर्समध्ये घट झालीय. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी लिमिटेड आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वरील सर्व 16 प्रमुख क्षेत्रातील निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक हे 2.18 टक्के आणि 1. 89 टक्के घसरले आहेत.


बँक निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण

बँक निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण सुरू आहे. आज तब्बल 2 टक्के बँक निफ्टीमध्ये घसरण झाली असून, बँक निफ्टी 54 हजारांच्या खाली गेली आहे. खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकचे शेअर्स कोसळत आहेत.

शेअर बाजार घसरणीमागील प्रमुख कारणे
1) कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
इराणने दोन तेल टँकरवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गॅस, इंधन पुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूड फ्युचर्स 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचले होते. शुक्रवारी जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइल 100.5 डॉलर्स प्रति बॅरल आहे. त्यामुळे किंचित वाढ झाली आहे. तेलाची आयात कमी होत असल्याने देशाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेअर बाजार घसरत आहे. महाग तेल खरेदी केल्याने जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढत आहे. तर इंधनाच्या किंमतीही वाढत आहे. त्यामुले कंपन्यांचा नफाही घटणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे बाजारातून पैसे काढून घेत आहे.


2) कमकुवत जागतिक संकेत

वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजार दबावात आहेत. आशियामध्ये दक्षिण कोरियाचा KOSPI, जपानचा Nikkei 225, चीनचा SSE कंपोझिट इंडेक्स आणि हाँगकाँगचा Hang Seng इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेत डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी, एस अँड पी 500 आणि नॅस्डॅक कंपोझिटमध्ये मोठी घसरण झाली आहे. डाऊ जोन्स 700 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. जागतिक बाजारपेठ कमकूवत होत आहे. अमेरिकेतील शेअर बाजार कमकूवत झाला आहे. बाजार पुन्हा वाढण्यास काळी काळ लागणार आहे. ब्रेंट क्रूड 100 डॉलर्सवर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे बचावात्मक निर्णय घेत असल्याचे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही. के. विजयकुमार म्हणाले. विदेशी गुंतवणूक संस्था सातत्याने विक्री करत आहे. त्यामुळे लॉर्ज कॅप आणि ब्लू चिप्स शेअर्स दबावाखाली आहेत, असे व्ही. के. विजयकुमार यांनी म्हटलंय.


3) एफआयआयची जोरदार विक्री

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय बाजारातून निघून जात आहे. त्यांचा विक्रीचा ट्रेंड सुरूच आहे.
सतत एफआयआय विक्री: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) देशांतर्गत बाजारात त्यांचा विक्रीचा ट्रेंड सुरू ठेवला. एक्सचेंज डेटानुसार गुरुवारी एफआयआयने 7049 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहे. मार्च महिन्यात पहिल्या बारा दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी 39 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत.


4) रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर:
शुक्रवारी भारतीय रुपया आणखी कमकुवत झालाय. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये 12 पैशांनी घसरण होऊन तो 92.37 विक्रमी नीचांकी पातळीवर गेलाय. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९२.३३ वर उघडला आणि दिवसभरात 92.37 या नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्यामुळे कच्चे तेल आयात व इतर आयात वस्तूंसाठी भारताला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.


5) यूएस फेड धोरण

गुंतवणूकदार 17 मार्च रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाची देखील वाट पाहत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्राइम रिसर्चचे प्रमुख देवर्ष वकील म्हणाले की, मध्यवर्ती बँक व्याजदरात बदल करणार नाही, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय बँकेकडून दर स्थिर ठेवण्याची अपेक्षा आहे.

6) बँक, ऑटो शेअर्समध्ये विक्री
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स घसरले आहे. बँक निफ्टी निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवारी बँक निफ्टी इंडेक्स 54 हजारांच्या खाली कामकाज करत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकच्या शेअर्समध्ये सव्वा दोन ते पावणे तीन टक्का घसरण झाली आहे. इंडसइंड बँकेत 2.6 टक्के घसरण झाली आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात ऑटो शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती, गॅस टंचाई, पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये दोन टक्के घसरण झाली आहे.
जियोजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे ​​मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की, निफ्टी नजीकच्या काळात दबावाखाली राहू शकतो.

Exit mobile version