Download App

Sharad Pawar : ‘त्या’ खासदाराला सोबत घेत लोकसभा सभापतींना भेटले

नवी दिल्ली- लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faisal) यांना खुनाच्या प्रयत्नात कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां (Lok Sabha Speaker Om Birlan) यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ओम बिर्लां यांची भेट घेतली.

यावेळी खासदार मोहम्मद फैजल हे देखील उपस्थित होते. या संदर्भात शरद पवार यांनी स्वत: या भेटीचे फोटो ट्विट करुन माहिती दिली आहे.

खासदार मोहम्मद फैजल यांना खुनाच्या प्रयत्नात दोषी असल्यानं त्यांचे खासदारकीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर अपात्रता रद्द करण्याची विनंती शरद पवार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां यांच्याकडे केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी खासदार मोहम्मद फैजल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिका निकाली काढताना सांगितले की, निवडणूक आयोगाने असे म्हटले आहे की, केरळ उच्च न्यायालयाने माजी खासदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोग सध्याच्या नियमांनुसार पुढील कारवाई करेल.

फैजल यांना 2017 मध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून 11 जानेवारी रोजी लक्षद्वीप सत्र न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे.

Tags

follow us