Sharad Pawar Said I am not in the race for the post of Prime Minister : आपण पंतप्रधानपदाच्या (Prime Minister) शर्यतीत नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. पण शरद पवार यांच्या वयाप्रमाणे, असा शब्द माझ्याबद्दल कधीही बोलू नका, असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला. पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नच राहणार का? अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कुलगुरू राम ताकवले यांच्या शोकसभेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून लावण्यासाठी शरद पवार देशभरातील भाजप विरोधी पक्षांच्या मोट बांधत आहेत. त्यामुळं शरद पवार हे पंतप्रधानपदाचे दावेदार असलल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
यावेळी पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला, तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहात का? या प्रश्नाला पवारांनी उत्तर दिलं की, अजिबात नाही. ते म्हणाले की, आम्हाला अशा नेतृत्वाची गरज आहे जे या देशात स्थिरता आणि विकासाला चालना देईल, उद्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला, शक्ती दिली तर आम्ही नक्की चांगलं काम करू… सगळ्या विरोधकांना एकत्र आणणं, त्यांना आधार देणे, त्यांना बळ देणे आणि ते मागतील तेथे त्यांना मदत करणे ही माझी जबाबदारी आहे, असं पवार म्हणाले.
दलित-आदिवासी राष्ट्रपती बनवण्यामागे BJP चा स्वार्थ; नव्या संसद सदनाच्या उद्घाटनवरून खर्गेंची टीका
2019 मध्ये भापजला सगळ्यात जास्त जागा असूनही पवार यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आणि आताही ते देशात विरोधकांची मोट बांधत आहेत. अशाच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असं सांगितलं. शरद पवारांच्या या उत्तरामुळे त्यांनी पुन्हा किंग मेकरची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे का, अशी चर्चा आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत उत्तर देण्यापूर्वी माझ्या वयाप्रमाणे असा शब्द पुन्हा कधी वापरू नका, असा सल्लाही दिला. त्यांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. दरम्यान, आताही त्यांनी पीएम पदाच्या शर्यतीत नाही, असं वक्तव्य केलं. दरम्यान ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, या भूमिकेवर ठाम राहणार का, याविषयी अनेक शक्यता बोलल्या जात आहेत.