मुंबई : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) घेण्यास तयारी दर्शवली आहे. पण ही सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी मोदींसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. (Sharad Pawar On Z Plus Security)
सांगलीत शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? संजयकाका पाटलांनी घेतली पवारांची भेट
पवारांच्या पत्रातील अटी-शर्थी नेमक्या काय?
केंद्राच्या झेड प्लस सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी केंद्राला काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. यात त्यांनी केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार, कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार तसेच स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल अशा प्रमुख तीन अटी पत्रात नमुद केल्या आहेत. या अटी मान्य केल्यातरच केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाईल असे पवारांनी म्हटले आहे.
http://मोदी-चंद्रचूड भेटीनंतर राऊतांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, शंका पक्क्या झाल्या…
योग्य आणि अचूक माहिती काढण्यासाठी सुरक्षा
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मी स्वत: आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असं पवार म्हणाले होते. एवढेच नव्हे तर, आगामी काळात विधानसभांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी मला सगळीकडे फिरावं लागत आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली होती.
शिवसेना-राष्ट्रवादीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टातील ‘त्या’ याचिकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर..
कशी असते झेड प्लस सुरक्षा व्यवस्था
झेड प्लस सुरक्षेत दहापेक्षा जास्त एनएसजी, एसपीजी कमांडो, पोलीस यांच्यासह एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही यात तैनात असतात. या कमांडोंचं काम संबंधित व्यक्तीची चोवीस तास सुरक्षा करणे हेच असते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तयार असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हत्यारे असतात.