मोहन भागवत यांच्या सुरक्षेचे कडे आणखी अभेद्य : PM मोदी अन् अमित शाहंनंतर बनले तिसरे व्यक्ती

मोहन भागवत यांच्या सुरक्षेचे कडे आणखी अभेद्य : PM मोदी अन् अमित शाहंनंतर बनले तिसरे व्यक्ती

RRS chief Mohan Bhagwat Z+ security : केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा होती. मात्र, आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे झेड प्लस पेक्षा अधिक ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा देण्यात आली आहे. (Mohan Bhagwat) एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. काही दिवसांपूर्वीच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती.

58 वर्षांपूर्वींचे निर्बंध हटवले! सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात

मल्टी लेयर सुरक्षा

संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा आहे. आता त्यांना मिळणाऱ्या एएसएल या वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे. दरम्यान, डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी आढावा घेण्यात येणार आहे.

का वाढवली सुरक्षा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले. त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली. मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंता आणि विविध एजन्सींकडून मिळालेल्या माहितीनंतर, गृह मंत्रालयाने भागवत यांना ASL सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला. वाढीव सुरक्षेबाबत माहिती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, शरद पवारांना मिळणार Z Plus सुरक्षा, हे आहे कारण

55 कमांडोकडून झेड प्लस होती

आरएसएस प्रमुखांना जून 2015 मध्ये सीआयएसएफच्या 55 कमांडोकडून झेड प्लस सुरक्षा मिळाली होती. यापूर्वी, यूपीए सरकारने 2012 मध्ये त्यांना झेड-प्लस सुरक्षा कवच प्रदान करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कर्मचारी आणि वाहनांच्या कमतरतेचे कारण देत ही सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. झेड प्लस सुरक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या सुरक्षेतील कमांडो 24 तास त्या व्यक्तीसोबत राहतात. सुरक्षेसाठी तैनात असलेले कमांडो NSG चे असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या