Share Bazar : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस समाधानकारक राहिला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये (Small cap and mid cap share)जोरदार खरेदीमुळं, निफ्टीच्या (Nifty)मिड कॅप-स्मॉल कॅप निर्देशांकाने आजच्या व्यवहारात पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली.
‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं
शेअर बाजारात आजच्या ट्रेडिंग सत्रात लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपनं नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 389.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तीच मागील ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 386.83 लाख कोटी रुपये होती. आजच्या व्यवहारात गुंतवणुकदारांच्या संपत्तीमध्ये 2.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कांद्याच्या प्रश्नासाठी खासदार विखे गृहमंत्र्यांच्या दारी, अमित शाह म्हणाले…
शेअर बाजारातील व्यवहार थोड्या कमजोरीने संपले. BSE सेन्सेक्स 34 अंकांच्या कमजोरीसह 72152 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1 अंकाच्या वाढीसह 21930 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंग काळात सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक मर्यादेत बंद झाले. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी BSE सेन्सेक्स 34 अंकांनी घसरुन 72 हजार 152 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21 हजार 930 अंकांवर बंद झाला.
बुधवारी शेअर बाजारात काही चढ-उतार पाहायला मिळाले. टेक महिंद्रा आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमजोरी पाहायला मिळाली. पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि विप्रोचे शेअर्सही शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत पाहायला मिळाले.
शेअर मार्केटमध्ये वाढ झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, एसबीआय, सन फार्मा, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली.