शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’! सेन्सेक्स 989 अंकांनी कोसळला, निफ्टी 25,600 वर; गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान

Stock Market Crash: 27 नोव्हेंबरला भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 989 अंकांनी, तर निफ्टी 277 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे 2.09 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Share Market Collapes

Share Market Collapes

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मोठी पडझड झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले आहे. सेन्सेक्स तब्बल 989 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25,600 च्या आसपास बंद झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झालीआहे.

शुक्रवारी बाजारात विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स दिवसाच्या व्यवहारात 1,120 अंकांपर्यंत घसरला होता. त्याने 83,208.33 ही दिवसातील नीचांकी पातळी गाठली. निफ्टीमध्येही 318 अंकांहून अधिक घसरण झाली आणि तो 25,565.90 पर्यंत खाली बाजार बंद होताना सेन्सेक्स 989.33 अंकांची घसरण नोंदवत 83,339.26 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी 277.30 अंकांनी घसरून 25,607.20 अंकांवर बंद झाला.


‘माझ्या नावाचं बेकायदा होर्डिंग लागलं तर पुरस्कारांच्या यादीत माझंही नाव टाका’; पुण्यातील होर्डिंग कारवाईवर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

या घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. गुरुवारी (26 नोव्हेंबर) बाजार बंद झाल्यानंतर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 515.20 लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर ते 513.11 लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.09 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली.

आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
शुक्रवारी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आयटी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात जवळपास 2 टक्क्यांपर्यंत बाजारातील विक्रीच्या दबावामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. निफ्टीमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), JSW स्टील, टायटन, हिंडाल्को आणि SBI लाइफ इन्शुरन्स हे शेअर्स टॉप गेनर्समध्ये राहिले. दुसरीकडे श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, HCL टेक, इन्फोसिस आणि TCS हे शेअर्स टॉप लूजर्समध्ये होते.

गुरुवारी बाजारात तेजी, शुक्रवारी अचानक घसरण
गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स 390.31 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 84,328.59 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीदेखील 65.25 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 25,884.50 अंकांवर स्थिरावला होता.
याशिवाय बीएसई स्मॉलकॅप सेलेक्ट निर्देशांक 0.78 टक्क्यांनी, तर मिडकॅप सेलेक्ट निर्देशांक 0.65 टक्क्यांनी वधारला होता. मात्र, शुक्रवारच्या सत्रात बाजारातील तेजीला ब्रेक लागला आणि मोठी घसरण पाहायला मिळाली.


अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली! 3,450 रुपये दर निश्चित; पहिली उचल 3,250 रुपये


रुपयाचीही मोठी घसरण; डॉलर 92.98 रुपयांवर

शेअर बाजारातील घसरणीसोबतच भारतीय रुपयावरही दबाव दिसून आला. शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरून 92.98 रुपये प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरी यामुळे रुपयाची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी रुपया 18 पैशांनी घसरून 92.38 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला होता. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्सचा भाव 97 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयातील कमजोरी यामुळे आगामी काळात बाजाराच्या हालचालींवर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version