Iran war impact dalal street-इस्रायल-इराण युद्धामुळे (Iran war) पश्चिम आशियामध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांबरोबर आता जगालाही युद्धाची झळ बसू लागलीय. जगभरात कच्चे तेल, गॅसच्या किंमती वाढू लागल्या आहेत. आता त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलाय. याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत किती घसरण झालीय. गुंतवणूकदारांच्या किती कोटीच्या संपत्तीमध्ये घट झालीय, कोणते शेअर्स घसरले हे आपण पाहुया…
युद्ध सुरू होण्यापूर्वीपासून अनेक कारणांमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे. युद्धानंतर गेल्या आठ दिवसात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 31 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तर जानेवारीपासून विचार केला तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत किंवा शेअर्सच्या मूल्यात 47 लाख कोटींची घट झालीय. शेअर बाजारात खूप मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. 5 जानेवारीला निफ्टी इंडेक्स रेकॉर्डवर होता. त्यामुळे बाजारात नवीन बुल रन सुरू होणार असे संकेत होते. पण काहीच दिवसांत शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. मिडल इस्टमध्ये वाढत गेला. त्यानंतर इस्रायल आणि इराणचे युद्ध सुरू झाले. त्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले. भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवड्याभरात 31 लाख कोटी रुपयांचे शेअर्स मूल्य घटले आहे.
‘निफ्टी-50’ मध्ये पाच टक्के घट, बँकांचे शेअर्स सर्वाधिक कोसळले
27 फेब्रुवारीपासून बाजारात जोरदार घसरण सुरू झालीय. निफ्टी -50 इंडेक्स हा तब्बल पाच टक्के घटला आहे. बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झालीय. निप्टी बँक इंडेक्समध्ये तब्बल आठ टक्के घसरण झालीय. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील शेअरमध्ये घसरण सुरू आहे. निप्टी मिडकॅप-100 हा 5.5 टक्के, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 हा 5.2 टक्के घसरला आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झालीय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पीएसयू बँक इंडेक्स 11 टक्के घटला आहे. त्या व्यतिरिक्त पर्यटन क्षेत्रात 9 टक्के, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये आठ टक्के घसरण झालीय. तर रियल्टी सेक्टरमध्ये सात टक्के घट झालीय.
एनर्जी आणि एफएमसीजी सेक्टरही दबावात
एनर्जी आणि एफएमसीजी सेक्टरही दबावात आहे. दोन्ही इंडेक्समध्ये चार टक्के घसरण झालीय. आयटी सेक्टरमध्ये या आठवड्यात कमी पडझड झाली. कारण या सेक्टरमध्ये पूर्वीच घसरण झाली आहे. निफ्टी-50 मधील अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. टाटा मोटर्स पॅसेंजर वाहनांचा शेअर 13 टक्के घसरला आहे. तर इंडिगो विमान कंपनीचा शेअर्स 13 टक्के घटला आहे. तर एल अॅण्ड टी कंपनीचा शेअर 11 टक्के घटला आहे. तर अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टिलचा शेअर्समध्ये दहा टक्के घट झाली आहे. तर निफ्टी-500 मधील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. नेटवेब शेअर्स 20 टक्के पडला आहे. तर जेके टायर्स आणि फोर्स मोटर्सच्या शेअरमध्ये 17 टक्के घसरण झालीय. तर पेट्रोनेट एलएनजी आणि एमजीएलच्या शेअर्समध्ये 15 टक्के घट झाली आहे.
या मिडकॅप शेअर्समध्ये घसरण
मिडकॅप शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण होतेय. बँक ऑफ इंडियाचा शेअर्स 15 टक्क्यांनी पडलाय. रेल्वे सेक्टरमधील आरव्हीएनएल शेअर्स 13 टक्क्यांनी घटलाय. एचपीसीएल आणि यूनियन बँकेचा शेअर्स 13 टक्के घसरा आहे. तर ऑको सेक्टरमधील अशोक लेलंड आणि सेल कंपनीचा शेअर्स 12 टक्के घसरला आहे. या व्यतिरिक्त डाबर, कोरोमंडल, आयजीएल आणि फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे दहा टक्के घसरण झालीय.
सोमवारी शेअर बाजारात मोठा भूकंप
सोमवारी मात्र शेअर बाजारत सर्वात मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये 2229 टक्के घसरण झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 76,619 पर्यंतवर गेला आहे. त्यानंतर दुपारी त्यात काही सुधारणा झाली. तर एनएसई निफ्टी-50 मध्ये तर सातशे अंकांनी घसरण झाली. त्यामुळे निफ्टी इंडेक्स 23,736 पर्यंत खाली गेला. दुसऱ्या सत्रात निफ्टीमध्ये चारशे अंकांनी सुधारणा होऊन निफ्टी 24 हजारांवर आली.
शेअर बाजार घसरणामागे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आहे. या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती लाढल्या आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. विदेशी गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडत असल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे.
शेअर्स बाजारात घसरण झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार नव्याने शेअर्स खरेदी करतात. त्यावेळी कमी किंमतीत शेअर्स मिळतात. सध्याची अस्थिर परिस्थिती पाहता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे.
