Download App

Share Market : सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक घोडदौड, गुंतवणुकदारांच्या मालमत्तेत 3 लाख कोटींची वाढ

Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात Share Market मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टीनं (Nifty)यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांची (investors)चांगलीच चंगळ झाल्याची दिसून आली. आज एका दिवसात गुंतवणुकदारांना जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आज दिवसभरातील ड्रेडिंग काळात आयटी कंपन्यांच्या शेअर्सनं चांगलाच भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सनं 847 अंकांची तगडी उसळी घेतली. दुसरीकडं आज पहिल्यांदा निफ्टी 21 हजार 900 च्या पुढे बंद झाला.

मुंबईतील मोदींच्या भाषणात काँग्रेसचं शरसंधान; विकासकामांवरून वाचला तक्रारींचा पाढा

दिवसभरातील ड्रेडिंग काळाच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 847.27 अंकांनी वाढून 72,568.45 वर बंद झाला. आणि एनएसईचा निफ्टी 50 शेअर्सचा निर्देशांक 260.80 अंकांनी वाढून 21 हजार 894.55 च्या पातळीवर बंद झाला. बीएसईचा सेन्सेक्स 72 हजार 720.96 च्या ऑलटाईम हायवर पोहोचला. तर दुसरीकडे NSE निफ्टीने 21 हजार 928.25 अंकांचा विक्रमी उच्चांक गाठल्याचे दिसून आले.

Baipan Bhari Deva: जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकात झळकले दिग्दर्शक साई-पियूष अन् केदार शिंदे

शेअर बाजारात आज ट्रेडिंग काळात आयटी कंपन्यांच्या शेअर्सनं चांगलाच भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली. टेक महिंद्रा (Tech Mahindra)कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ दिसून आली. दुसरीकडे अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, बजाज फिनजर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये चांगली घसरण पाहायला मिळाली.

आज ट्रेडिंग काळात अदानी ग्रुपच्या 10 शेअर्सपैकी 4 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी तर उर्वरीत 6 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. आज दिवसभरात अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.01 टक्यांची घसरण दिसून आली.

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 373.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ते गुरुवारी 370.47 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल आज दिवसभरात तब्बल 2.97 लाख कोटींनी वाढले. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदार मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले.

follow us

वेब स्टोरीज