शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) हे सध्या दिल्लीत आहेत. काल त्यांनी जंतरमंतरवर आंदोलकांशी चर्चा करून त्यांना संबोधित केलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. उद्धव ठाकरे आज दुपारीच मुंबईकडं यायला निघणार आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांच्या कालच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांना पोलिसांनी अक्षरश: उचलून घेत पोलीस ठाण्यात नेलं होतं. रात्री उशिरा सोनिया गांधी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या या आंदोलनावर आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, आज आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जंतरमंतरवरील आंदोलन आणि देशातील इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली. 2024 मध्ये नीटची परीक्षा झाली होती. त्यावेळी पेपर लिक झाला होता. त्या प्रकरणातील मास्टर माइंडची वेळेवर चार्जशीट दाखल केली नाही. जे चोर आहेत. त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली जात नाही. त्यांना ऑटोमॅटिक बेल मिळेल अशा पद्धतीने वागत आहेत आणि म्हणता आम्ही परीक्षा पद्धतीवर काम करत आहोत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
मी उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो होतो. देशात जे आंदोलन सुरु आहे, यावर सविस्तर चर्चा झाली. सध्याची परिस्थिती भयानक आहे. हे विद्यार्थी आहेत. देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यावर अमानुष लाठीमार करू नका. त्यांच्याशी असं वागू नका, असं मी सरकारला सांगितलं. आम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले. भोपाळचा एक विद्यार्थी बघितला. तो स्वतः डबा घेऊन इकडे आला आहे. पूर्ण जनपथ भरलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यातुन विद्यार्थी येत आहेत. शिक्षण व्यवस्थेत खूप गोंधळ आहे. लोकांना समाधान मिळालं नाही, त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांना रोखण्याचं काम करू नका. लोकांचं म्हणणं ऐका. फायद्याचं राहील, असा सल्लाही केजरीवाल यांनी दिला.
