Download App

MP Election : चर्चेला पूर्णविराम! शिवराज सिंह यांना तिकीट मिळालं; भाजपची दुसरी यादी जाहीर

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आज भाजपकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये शिवराज सिंह(Shivraj Singh Chauhan) यांच्यादेखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे आता भाजपकडून शिवराज सिंह चौहान निवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनूसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे बुधनीमधून, एचएम नरोत्तम मिश्रा दतियामधून, गोपाल भार्गव रेहली मतदारसंघातून, विश्वास सारंग नरेला मतदारसंघातून तर तुलसीराम सिलावत सनवेरमधून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने याआधी जाहीर केलेल्या 39 उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या नावाचा समावेश नव्हता. इतर अनेक दिग्गज नेत्यांना भाजपकडून संधी देण्यात आली होती. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवर प्राणघातक हल्ला; भर रस्त्यात मारहाण करत हल्लेखोर पसार

देशातील लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) होत आहेत. या निवडणुकासांठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. टाइम्स नाऊ-नवभारतने हा पोल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जर आज मध्य प्रदेशात निवडणूक झाली तर भाजपला 102 ते 110 जागा मिळतील. तर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना दोन जागा मिळतील. या निवडणुकीत भाजपाला 42.8 टक्के आणि काँग्रेसला 43.8 टक्के मते मिळू शकतात, असा पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

धक्कादायक! नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच; 24 तासात 6 नवजात बालकांसह 15 जण दगावले

भाजपकडून याआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी विचारले आहे की, त्यांच्याच पक्षाचा त्यांच्यावर विश्वास नाही, तर राज्यातील जनता त्यांच्यावर विश्वास कसा असेल? असा सवाल रागिणी नायक यांनी केला होता. भाजपच्या याद्या येत आहेत, पण त्यात त्यांच्या (चौहान) कट्टर प्रतिस्पर्ध्यांची नावे आहेत. चौहान यांचे नाव अद्याप यादीत आलेले नाही. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचे नाव येईल की नाही हे कोणालाच माहीत नसल्याचं स्पष्टीकर रागिणी यांनी दिलं होतं.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं नाव भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. याच मुद्द्यावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी शिवराज सिंह चौहान यांना चांगलच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर आज भाजपने प्रसिद्ध केलेल्या यादीत शिवराज सिंह चौहान यांचं नाव असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Tags

follow us