Download App

अंडरवियरच्या विक्रीत घट; डेटिंग अ‍ॅप अन् वेबसाईट्सला पसंती : भारत मंदीच्या उंबरठ्यावर?

पुरुषांच्या अंडरवियर केवळ त्यांच्या शरीरासाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही खूप महत्त्वाच्या असतात हे तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकले असेल. पण अर्थव्यवस्थेशिवाय पुरुषांच्या अंडरवियरच्या विक्रीवर इतर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका अहवालानुसार, भारतात अंडरवियरच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अंडरवियरची विक्री कमी होताच डेटिंग अ‍ॅप आणि वेबसाईट्सना फायदा होताना दिसत आहे. तुम्हाला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण इकॉनॉमी इंडिकेटर्सनुसार, हे अंडरवियरच्या विक्रीशीही संबंधित आहे, आणि हे काही अंशी खरंही आहे. (underwear sales in India are on the decline, dating apps and websites are benefiting)

अंडरवियरची विक्री कमी होऊ लागली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार, रूपा, डॉलर, जॉकीसह देशातील सर्व अंडरवेअर ब्रँडच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. यामागे अर्थशास्त्र असं आहे की, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत जेव्हा घसरण होते, तेव्हा त्याची चिन्हे त्या देशाच्या पुरुषांच्या अंडरवियर निर्देशांकात दिसू लागतात. मंदीच्या काळात लोक अंडरवियरसारख्या न दिसणाऱ्या वस्तू खरेदी करणे टाळतात. त्याऐवजी हा पैसा जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करणेच ते अधिक चांगले समजतात.

LIC एजंटनाही मिळणार ग्रॅच्युइटी अन् पेन्शन; मोदी सरकारने केली मोठी घोषणा

डिसेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत अंडरवेअरचा वापर 55 टक्क्यांनी कमी झाला होता. वर्षानुवर्षे अंडरवियरच्या खरेदीत घट होत आल्याने गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात यंदाच्या तिमाहीत 7.5% ची घट आणि विक्रीमध्ये 11.5% घट झाली आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत, जॉकीची पॅरेंट कंपनी असलेल्या पेज इंडस्ट्रीजच्या विक्रीत तिमाही घट झाली आहे. पेज इंडस्ट्रीजचे व्हॉल्यूम 11 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर रूपा अँड कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये 52 टक्के घट नोंदवली गेली आहे.

पण याचे डेटिंग वेबसाईटशी काय आहे कनेक्शन?

अर्थव्यवस्थेच्या निर्देशकांनुसार, जेव्हा जेव्हा देशाची अर्थव्यवस्था घसरते तेव्हा अंडरवियरच्या विक्रीतही घसरण सुरू होते. ज्याचा फायदा डेटिंग अ‍ॅप आणि वेबसाईट्सना होतो. अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यामुळे डेटिंग वेबसाइट्सचे उत्पन्नही वाढते. मंदीमुळे लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतात. यामुळे लोकांना घरीच राहावे लागते आणि अशावेळी ते आपला वेळ घालवण्यासाठी डेटिंग वेबसाइट्सचा वापर करतात. त्यामुळे डेटिंग वेबसाइटची चांदी झाली आहे. 2009 मध्ये अमेरिकेतील बाजारातील मंदीच्या काळात, Match.com चा चौथ्या तिमाहीचा नफा सात वर्षांतील सर्वाधिक होता. या काळात देशात मंदी आली आणि लोकांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या. स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी लोक डेटिंग अ‍ॅप आणि वेबसाईट्सकडे वळले होते.

G20 यशस्वी आयोजन एका व्यक्तीने किंवा पक्षाने केले नाही : PM मोदींनी दिले देशवासियांना श्रेय

डेटिंग वेबसाईट्स आणि मंदीचा पॅटर्न :

अमेरिकेची ऑनलाइन डेटिंग सेवा Match.com ने डेटिंग आणि मंदीच्या दरम्यान एक पॅटर्न नोंदवला. जेव्हा कंपन्या कठीण काळात असतात तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये डेटिंग वाढते. सामान्य माणसं आपली दु:खं बाजूला ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो. यापूर्वी, 2008 च्या चौथ्या तिमाहीत, डेटिंग साइटची व्यस्तता सात वर्षांत सर्वाधिक होती. 2001 मध्ये 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतरही Match.com वरील ट्रॅफिक वाढले होते. अमेरिकेपासून युरोपपर्यंत मोठे देश मंदीच्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेचे बँकिंग क्षेत्रही मोठ्या संकटात सापडले आहे. मंदीमुळे येथील अनेक मोठ्या बँका बंद पडल्या होत्या. आता भारतात मोठ्या ब्रँडच्या अंडरवेअरची विक्री कमी होत असताना हे मंदीचे लक्षण आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

Tags

follow us