Download App

धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सावात चेंगराचेंगरी, कुबेरेश्वर धामने ‘रुद्राक्ष’ वाटप थांबवले

  • Written By: Last Updated:

भोपाळ : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मध्यप्रदेशातील भोपालजवळ सिहोरच्या कुबेश्वर धाम (Kubeshwar Dham) येथे दरवर्षी रूद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंडीत प्रदीप मिश्रा (Pandit Pradeep Mishra) हे या महोत्सवाचे आयोजित करत असतात. यंदाही या महोत्सवात रुद्राक्ष मिळविण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम असल्याने राज्यातूनही हजारोच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला पोहोचले होते. या कार्यक्रमात रुद्राक्ष घेण्यासाठी अचानक झुंबड उडाल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला. आज सकाळपासूनच लाखो भाविक रुद्राक्षासाठी रांगेत लागलेत. पण अफाट गर्दीमुळे सध्या रुद्राक्ष वाटप (Allotment of Rudraksh) थांबवण्यात आले आहे.

रुद्राक्षाच्या आशेने भाविक काल दिवसभर रांगेत उभे होते. पण त्यांना रुद्राक्ष मिळाले नाही. रात्रीही भाविकांची ये-जा सुरुच होती. दरम्यान, आज सकाळी पुन्हा भाविक रांगेत उभे राहिले. गर्दी एवढी होती की पाय ठेवायलाही जागा नाही. कार्यक्रमस्थळी लाखोंची गर्दी आहे. दुसरीकडे, इंदूर-भोपाळ हायवेवर आज ट्रॅफीक जामची स्थिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्राक्ष वाटपासाठी ४० काउंटर सुरु करण्यात आले आहेत. गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप बुधवारपासूनच सुरू झाले होते. पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात असून रुद्राक्ष दर्शनासाठी दोन किलोमीटर लांब रांग आहे. दोन लाखांहून अधिक भाविक रांगेत उभे असल्याचा अंदाज आहे.

‘ऑटो टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्नांसाठी खासदार शरद पवार सरसावले

कुबेरेश्वर धाममध्ये जवळपास 10 लाख भाविक उपस्थित आहेत. गत 2 दिवसांत सुमारे 5 लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. भोपाळ-इंदूर रस्त्यावर गुरुवारी प्रचंड जाम झाला होता. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण रात्री पोलिसांनी तो सुरुळीत केला. भोपाळ-इंदूर रस्त्यावर सध्या सामान्य वाहतूक सुरू आहे.

भाविकांनी सांगितले की, सध्या उत्सवात रुद्राक्षाचे वाटप थांबवण्यात आले आहे. बॅरिकेडिंग तोडल्यामुळे समितीने हा निर्णय घेतला आहे. आता बॅरिकेडिंग झाल्यानंतरच पुन्हा रुद्राक्ष वाटप सुरू करण्यात येणार आहे.

आज भाविकांना संबोधित करताना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, तुम्ही लोक येथे आलात, भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. ही माझी प्रार्थना. आमच्याकडे जेवण सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असते. घाबरण्याची गरज नाही. 22 विहिरींचे पाणी येथे येत आहे. लाइट गेल्यावर थोडी समस्या येते. त्याबद्दल माफी असावी.

हरवलेल्यांच्या शोधासाठी अनाउंसमेंट
कार्यक्रमस्थळी हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी सातत्याने अनाउंसमेंट होत आहे. यंदाच्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकाची विक्रमी गर्दी झाली आहे. यामुळे कार्यक्रमस्थळी काहीशी अनागोंदी निर्माण झाली आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांनी रुद्राक्ष भेटेल या आशेने कुबेरेश्वर धाम परिसरात डेरा टाकला आहे.

मुख्यमंत्री चौहान यांचा दौरा रद्द

मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सीहोर स्थित कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दीमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर 3 महिला बेपत्ता झाल्या. रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत आपल्यापावली माघारी जात आहेत. येथे जवळपास 10 लाख जण जमल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपला येथील प्रस्तावित दौरा रद्द केला आहे.

 

Tags

follow us