Download App

…त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत थेट हनुमान चालिसाच म्हटली

Shrikant Shinde : मणिपूरवरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांत संघर्ष सुरूच आहे. याच मुद्द्यावर आजपासून (दि.8) लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी विरोधी पक्षातील तसेच सत्ताधारी पक्षातील खासदार या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करत आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीवर जोरदार निशाणा साधाला आहे. तेव्हा त्यांनी लोकसभेत थेट हनुमान चालिसा म्हणायला सुरू केली. (Shrikant Shinde sung Hanuman Chalisa Lok Saba in Parliament Session No Confidence Motion on PM Modi )

मणिपूर हिंसाचार ते वंदे भारत रेल्वे, सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सगळचं बाहेर काढलं…

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आणि चांगल्या कामांबाबत सांगताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारवर तसेच विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीवर जोरदार निशाणा साधाला आहे. तेव्हा ते म्हणाले की, महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणायला देखील बंदी होती. असा आरोप करत शिंदे यांनी मला पूर्ण हनुमान चालिसा येते असं म्हणत लोकसभेत थेट हनुमान चालिसा म्हणायला सुरू केली.

राष्ट्रवादीनं नौटंकी करण्याऐवजी मनपा सत्तेतून पायउतार व्हावं; काँग्रेसचा हल्लाबोल

पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले, की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. ज्या सावरकरांच्या विचारांवर शिवसेना पक्ष स्थापन झाला. जे विचार बाळासाहेबही मानत होते. ते विचार बाजूला ठेवत ठाकरे हे कॉंग्रेससोबत जात मुख्यमंत्री झाले. हीच ती ‘इंडिया’ आघाडी आहे. जी पदासाठी विचार बदलते. असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.

तसेच शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि गेल्या 10 वर्षांतील युपीए म्हणजे आताच्या इंडिया या आघाडी सरकारच्या कामांवर ताशेरे ओढले. तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारच्या अजेंडा आणि चांगल्या कामांबाबत भूमिका स्पष्ट केली. तर यावेळी लोकसभेत थेट हनुमान चालिसा म्हटल्याने श्रीकांत शिंदेंनी लक्ष वेधून घेतले.

Tags

follow us