राष्ट्रवादीनं नौटंकी करण्याऐवजी मनपा सत्तेतून पायउतार व्हावं; काँग्रेसचा हल्लाबोल
Kiran Kale On NCP : नगरमधील जवळपास सर्वच भागातील रस्ते भ्रष्टाचार, निकृष्ट कामांमुळे गायब झाले आहेत. नागरिकांना आपण नक्की एखाद्या शहरात राहतोय की डोंगरावर, टेकडीवर असा प्रश्न पडला आहे. हीच दयनीय अवस्था पिण्याचे पाणी, कचरा संकलन, आरोग्य अशा सर्वच बाबींबद्दल आहे. हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही मनपात सत्तेत असणाऱ्या पक्षांची आहे. मनपा सत्तेचा शंभर टक्के रिमोट कंट्रोल असणाऱ्या तसेच उपमहापौर, स्थायी समिती सभापती याच बरोबर सत्तेत असूनही विरोधी पक्षनेता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मनपातील आंदोलने ही नौटंकी असून त्याऐवजी आपली अकार्यक्षमता मान्य करून त्यांनी तात्काळ सत्तेतून पायउतार व्हावे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे.(Kiran Kale Criticize on NCP Ahmednagar Municipal Corporation congress ncp)
शेवगाव नगरपरिषदेचे अधिकारी सुस्त तर नागरिक त्रस्त; लोकप्रतिनिधी फिरकेनात…
काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी काळात जनतेच्या मनातील काँग्रेसचाच विकासाचा झेंडा मनपावर फडकेल असा विश्वास काळेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्रालय मारहाण प्रकरण बच्चू कडूंच्या अंगलट? अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा दिला जबाब
काळे म्हणाले की, राष्ट्रवादीची सत्तेतील कामगिरी ही कार्यसम्राट वाटावी अशी नसून शतप्रतिशत अकार्यक्षमता आहे. मागील साडेचार वर्षांच्या काळात आधी भाजप बरोबर त्यानंतर शिवसेनेबरोबर ते सत्तेत आहेत. मनपाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. कायम सत्तेत असून देखील कोणताही प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात याच राष्ट्रवादीच्या शहर लोकप्रतिनिधींनी शहर विकासाच्या दृष्टीने साधा ब्र सुद्धा काढला नाही. वस्तुस्थितीमध्ये, मनपा अधिकारी, विविध विभागाचे कर्मचारी राष्ट्रवादीच्या मागणीला केराची टोपली दाखवतात. कोणी त्यांचे ऐकत नाही. कारण आंदोलनातील सहभागी होणारे त्यांचे अनेक कार्यकर्ते हे मनपाचे विविध विभागातील कामांचे ठेकेदार, लाभार्थी आहेत.
हे कार्यकर्ते निकृष्ट कामे करून नगरकरांना वेठीस धरतात. यांची बिल निघायला विलंब झाला की हे मनपात येऊन आंदोलन करण्याची नौटंकी करतात. त्यामुळे यांची आंदोलने ही जनतेसाठी नसून कार्यकर्ते असणाऱ्या ठेकेदारांची बिलं लाटण्यासाठीची आहेत, असा घाणाघात काळे यांनी केला आहे.