शेवगाव नगरपरिषदेचे अधिकारी सुस्त तर नागरिक त्रस्त; लोकप्रतिनिधी फिरकेनात…

शेवगाव नगरपरिषदेचे अधिकारी सुस्त तर नागरिक त्रस्त; लोकप्रतिनिधी फिरकेनात…

Ahmednagar : एकीकडे स्वच्छ शहर, सुंदर शहर हा जयघोष करत शासनाकडून मोठ-मोठे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. तर दुसरीकडे शेवगाव तालुक्यात स्वच्छतेचा अक्षरशः बोजावर उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एकीकडे पावसाळा सुरु झालेला असताना केवळ नगर परिषेदेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्यांना केवळ प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. एकंदरीतच शेवगाव नगरपारिषदेचे अधिकारी सुस्त झाले असून त्यांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहे.(Ahmednagar Shevgaon Municipal council officials are lazy Citizens’ health is at risk)

शरद पवार ठाम! ‘वेळ पडल्यास नवी चळवळ उभी करू पण, भाजपसोबत जाणार नाही’

गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहरात मोठ्या नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा, स्वच्छता अशा समस्या आ वासून उभ्या राहिल्या आहेत. एकीकडे पावसाळा सुरु झाला आहे. या काळात रोगराई तसेच साथीचे आजार वाढण्याची शक्यता असताना नागरी समस्यांनी शेवगावकर त्रस्त झाले आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे शहरात एवढी भयाण परिस्थिती असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून नगरपरिषदेच्या या ढिसाळ कारभाराने नागरिक संतप्त झाले आहेत.

Radhakrushn vikhe : महापुरुषांवर बेताल वक्तव्य, विखे म्हणाले, प्रसिद्धीसाठी काहीजण…

महिन्यात केवळ दोनदा पाणीपुरवठा
जिल्ह्यात मोठ-मोठी धरणं आहेत तसेच गेल्यावर्षी पावसानेदेखील चांगली हजेरी लावली होती. मात्र असे असताना देखील शेवगाव शहरामध्ये नागरिकांना महिन्याभरात केवळ दोनदा म्हणजेच पंधरा दिवसांमधून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यातच पिण्याचे पाणी देखील अक्षरशः पिवळसर येत आहे. अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

नगरपरिषदेचे अधिकारी सुस्त…
शहरात मोठ्या नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र याकडे नगरपरिषदेसह सर्व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात सार्वजनिक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे एवढ्या समस्या असताना लोकप्रतिनिधी देखील आपल्या मतदार संघाकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube