Radhakrushn vikhe : महापुरुषांवर बेताल वक्तव्य, विखे म्हणाले, प्रसिद्धीसाठी काहीजण…
Radhakrushn vikhe Patil : अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. तसेच बेताल वक्तव्य केली जात असल्याने समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. यावर बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, अनेकदा महापुरुषांबाबत जी काही बेताल वक्तव्य केली जातात अशी वक्तव्य ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जातात तर कधीकधी नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जातात. आम्ही काही दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कोणाला देखील पाठीशी घालण्याचा प्रकार केला जाणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. (Radhakrushn vikhe Patil says Absurd statement about Great mans for only fame )
Kirkol Navre: नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “किरकोळ नवरे”
नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, हत्याकांड अशा घटना घडत आहे. याघटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून संबंधित गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. मात्र तरी देखील अशा घटना नगर शहरात तसेच जिल्ह्यात घडत आहे. दरम्यान याच अनुषंगाने मंत्री विखे यांना विचारण्यात आले.
Facebook Meta : …म्हणून फेसबुसची पॅरेंन्ट कंपनी मेटाला दररोज भरावा लागणार 82 लाखांचा दंड
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य केले. नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला होता. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, मध्यंतरी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यानंतर शासनाने कारवाई सुरु केली आहे. मात्र असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
मोक्का लावण्याची गरज असले तर त्यांच्यावर त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येतील असे आदेश देण्यात आले आहे. प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जात असून कोणालाही पाठीशी घालण्याचा संबंधच येत नाही.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करतात…
महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. यावर भाष्य करताना विखे म्हणाले, अनेकदा महापुरुषांवर अशी वक्तव्य ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जातात तर कधीकधी नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जातात. मात्र अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.