Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch : अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर 3 आंतराळवीरांना घेऊन अॅक्सिओम-४ मिशन (Axiom-4 Mission) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) यशस्वीरित्या रवाना झाले आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 12.01 वाजता हे मिशन प्रक्षेपित करण्यात आले. शुभांशू शुक्लासह अमेरिका, पोलंड आणि हंगेरीतील अंतराळवीर या अंतराळयानात प्रवास करत आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर आता भारताचा दुसरा अंतराळवीराने अंतराळात जाण्यासाठी उड्डाण भरले आहे. त्यामुळे हे मिशन भारतासाठी खूप खास मानले जात आहे. शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी या मोहिमेत अंतराळयानात त्यांच्यासोबत आंबे आणि गाजराचा हलव्यासह अनेक गोष्टी नेल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.4
अॅक्सिओम-४ मोहिमेत भारतीय शुभांशू शुक्लांचा सहभाग; ‘ही’ महत्वाची जबाबदारी ते पार पाडणार
शुभांशू शुक्लांनी कोण-कोणत्या गोष्टी सोबत नेल्या?
सोबतीला एक सॉफ्ट टॉय
वरील खाद्या पदार्थांशिवाय शुक्ला यांनी त्यांच्यासोबत एक सॉफ्ट टॉयदेखील सोबत नेले आहे. ज्याचे नाव शुभांशू यांनी जॉय असे ठेवले आहे. एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी हंसचे सॉफ्ट टॉय दाखवले होते. अॅक्सिओम-४ मिशनमधील हा पाचवा क्रू मेंबर असेल असेही शुक्ला यांनी सांगितले होते. जॉय एक्स-४ क्रूसाठी फक्त एक साथीदार नसून त्याहूनही जास्त असेल.
इराणचा अणुकार्यक्रम अजून संपलेला नाही; अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालाने ट्रम्पचं गुपित उघड
सोबत नेलेल्या हंस टॉयचे विशेष महत्त्व
अॅक्सिओम-४ मिशनसाठी अंतराळात घेऊन गेलेले हंसाचे सॉफ्ट टॉय पाच इंचाचे असून, याबाबत बोलताना कमांडर व्हिट्सन म्हणाले होते की, हंस त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो आणि सर्व क्रू सदस्यांमध्ये त्याचे वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. भारतात हंस हे ज्ञानाची देवी सरस्वतीचे वाहन आहे आणि ते ज्ञान आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. हंगेरीमध्ये, ते निष्ठा आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, तर पोलंडमध्ये, हंस शुद्धता आणि निष्ठेचे सूचक मानले जाते.
कोणते प्रयोग केले जाणार?
14 दिवसांच्या या मोहिमेत 7 भारतीय आणि 5 नासाच्या (NASA) शास्त्रज्ञांसोबत प्रयोग केले जाणार आहेत. ज्यात मूग आणि मेथीची लागवड करण्याचादेखील समावेश आहे.
गुगलची मोठी घोषणा! भारतात AI Mode लाँच; डेटा सर्च होणार आणखी सोपं
अंतराळात प्रवास करणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला कोण आहेत?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर होणार आहे. ते लढाऊ विमान उडवण्यात मास्टर आहे. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर असणार आहेत. 10 ऑक्टोबर 1985 मध्ये लखनऊमध्ये जन्म शुभाशु शुक्ला यांचा जन्म झाला. जून 2006 मध्ये ते भारतीय हवाईदलात दाखल झाले. मार्च 2024 मध्ये ते ग्रुप कॅप्टन बनले.
शुभांशु शुक्ला यांनी Su-30 MKI, MIG-21, MiG-29, जगुआर, हॉक, डोर्नियर आणि An-32 सह विविध विमानांवर 2,000 पेक्षा अधिक तास उड्डान केले आहे. 2019 मध्ये त्यांनी रशियाच्या गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारताच्या गगनयान मिशनसाठी त्यांची इस्त्रोकडून निवड झाली.